मुंबई - भारतरत्न लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने निधन ( Lata Mangeshkar Passes Away ) झाले. त्यांच्यावर काल (रविवारी) सायंकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यविधी करण्यात आले. मंगेशकर कुटुंबीयांनी आज (सोमवारी) त्यांच्या अस्थी घेतल्या. रविवारी शक्य न झाल्याने अनेक नागरिक सोमवारी सकाळी लता मंगेशकर यांचे दर्शन घेण्यासाठी आले होते.
लता मंगेशकर यांचे कुटुंबीय अस्थि गोळा करण्यासाठी शिवाजी पार्कवर
भारतरत्न लता मंगेशकर यांचे काल दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर काल सायंकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आले. भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी बहिणीला मुखाग्नी दिला. दरम्यान, आज मंगेशकर कुटुंबीय अस्थी गोळा करण्यासाठी शिवाजी पार्कवर उपस्थित झाले आहे. यावेळी हृदयनाथ मंगेशकर यांचे चिरंजीव व लता मंगेशकर यांचे भाचे आदिनाथ मंगेशकर यांनी लता मंगेशकर यांच्या अस्थिंचे विधिवत पूजन केले. मिळालेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांच्या अस्थि प्रभुकुंज या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.
लता मंगेशकर यांच्या निधनाने भारतासह जगभरातील त्यांचे चाहते हळहळले आहेत. लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांनी सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून त्यांनी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आज शिवाजी पार्क मैदानावर त्यांच्या आस्थिंचे दर्शन घेऊन नागरिकांनी लता मंगेशकरांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान, काल लता मंगेशकर यांच्या अंतिम दर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, पियुष गोयल, देवेंद्र फडणवीस, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेता शाहरुख खान, अमिताभ बच्चन, आदींसह सामाजिक, राजकीय, कला क्षेत्रातील विविध मान्यवरांनी लता मंगेशकरांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. आपल्या सुरेल आवाजाने सहा दशकं कोट्यवधी श्रोत्यांच्या हृदयांवर राज्य करणाऱ्या लता मंगेशकर यांना शेवटचं पाहताना साऱ्यांचेच डोळे पाणावले होते.
शिवाजी पार्कमध्ये लतादीदींचे स्मारक उभारा, राम कदमांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे काल निधन ( Lata Mangeshkar Passes Away ) झाले. त्यांच्या निधनानंतर मुंबईतील शिवाजी पार्क येथे त्यांना पंचत्वात विलीन करण्यात आले. त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभारावे, असे पत्र भाजपा आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ( Ram Kadam Letter Cm Thackeray ) लिहले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Cm Uddhav Thackeray ) यांना लिहलेल्या पत्रात राम कदम म्हणतात की, "भारतरत्न लता दीदींचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात शिवाजी मैदान ( शिवाजी पार्क ) दादर, मुंबई येथे करण्यात आले. म्हणूनच लतादीदींच्या कोट्यवधी चाहत्यांच्या, संगीतप्रेमींच्या आणि हितचिंतकांच्या वतीने माझी नम्र विनंती आहे की, दिवंगत भारतरत्न लतादीदींचे शिवाजी पार्कमध्ये त्यांचे स्मारक उभारले जावे. त्यामुळे जनतेच्या या मागणीचा मान राखून हे स्मारक तात्काळ उभारावे, जेणेकरून हे ठिकाण जगाचे प्रेरणास्थान होईल, ही विनंती."
राम कदम यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
हेही वाचा -Video : समुद्र, पर्वत, झाडे-वेली याप्रमाणे दीदींचा स्वरही अजरामर