मुंबई -नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काही वेळ उरलेला असताना, गेट ऑफ इंडिया येथे मुंबईकर, इतर राज्यातील पर्यटक आणि परदेशी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. तसेच नववर्षाच्या स्वागताचा आनंद लुटत काऊंट डाउन करत आहेत.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 'गेट ऑफ इंडिया' येथे नयनरम्य रोषणाई हेही वाचा... २०१९ मधील या घटनांनी देशाला हादरवले, टाकूया शेवटची नजर..
गेट ऑफ इंडिया या भारताच्या मुंबईतील प्रवेशद्वाराजवळ वेगवेगळ्या रंगात रोषणाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे द्वार अतिशय सुंदर दिसत आहे. याचा आनंद सर्व नववर्षाच्या स्वागतासाठी आलेले नागरिक घेत आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक नवीन वेशभूषेत मिठाई, केक घेऊन गेट ऑफ इंडिया परिसरात दाखल झाले आहेत. तसेच नववर्षाचा स्वागतासाठी जल्लोष करत आहेत.
हेही वाचा... आधार-पॅनकार्ड लिंक केलं नसेल तर घाबरू नका; प्राप्तिकर विभागानं दिली मुदतवाढ