मुंबई -सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी पुण्यातील आपल्या राहत्या घरी ३ जून रोजी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी राजू सापते यांनी एक व्हिडीओ शूट करून प्रसिद्ध केला आणि त्यांच्या हत्येला कोण कारणीभूत आहे हे नमूद केले आहे. कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या निधनानंतर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकांनी गोरेगाव फिल्म सिटीच्या गेटजवळ मेणबत्त्या लावून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर चित्रपट संघटनेच्या विरोधात निदर्शने केली. याप्रकरणी काही जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून एकाला अटक करण्यात आली आहे.
कला दिग्दर्शक राजू सापते यांना फिल्म सिटीजवळ मेणबत्या लावून वाहिली श्रद्धांजली - art director Raju Sapte
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी पुण्यातील आपल्या राहत्या घरी ३ जून रोजी आत्महत्या केली. त्यांच्या निधनानंतर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकांनी गोरेगाव फिल्म सिटीच्या गेटजवळ मेणबत्त्या लावून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर चित्रपट संघटनेच्या विरोधात निदर्शने केली.
चंदन रामकृष्ण ठाकरे (वय ३६, रा. जीवनज्योती सोसायटी, कांदिवली वेस्ट, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच नरेश विश्वकर्मा (मिस्त्री), गंगेश्वर श्रीवास्तव (संजूभाई), राकेश मौर्य, अशोक दुबे (सर्व रा. मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांची पत्नी सोनाली राजेश साप्ते (वय ४५, रा. चारकोप, कांदिवली वेस्ट, मुंबई) यांनी वाकड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी या सर्वांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
बॉलीवूडमधील कामगार नेत्यांच्या खंडणीखोरीचा राजेश सापते हे बळी ठरल्याचे सांगितले जात आहे. सापते कुटुंबीय हे मुंबईत वास्तव्यास असून त्यांचा ताथवडे येथील अशोकनगरमधील द नुक सोसायटीत फ्लॅट आहे. राजेश सापते हे शुक्रवारी एकटेच पुण्यात आले. त्यांनी आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ शेअर केला. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तो होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांच्या पत्नीने पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने त्यांच्या घरी धाव घेतली. तेव्हा सापते यांनी घरात गळफास घेतल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेले, परंतु, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. आरोपी नरेश विश्वकर्मा, गंगेश्वर श्रीवास्तव, राकेश मौर्य व अशोक दुबे यांनी कट करुन राजेश सापते यांना जीवे मारण्याची धमकी दिली़, असल्याचे पोलिसांनी सांगितले.