मुंबई -महानगरपालिकेने मुंबई शहर व उपनगरातील बेघरांसाठी आणि शहराबाहेर जाणाऱ्या कामगारांसाठी अन्न व निवासाच्या मदतीसाठी संपर्क क्रमांक दिला आहे. या क्रमांकावर संपर्क साधला असता कॉल लागत नाही अथवा मार्गात अडथळा आहे, अशा तक्रारी लोक करत आहेत. लोकांचा संपर्क होत नसल्यामुळे लोकांना काय करावे हे कळत नाही आहे.
महापालिकेने बेघरांच्या अन्न व निवासाच्या मदतीसाठी दिलेला हेल्पलाईन क्रमांक लागतच नसल्याने लोकांचे होतायत हाल - news about mumbai corporation
महानगरपालिकेचा संपर्क क्रमाक लागत नसल्यामुळे शहरातील बेघर आणि बाहेर जाणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत. पालिकेने १८००२२१२९२ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले होते.
महानगरपालिकेने मुंबई शहर व उपनगरांतील बेघरांसाठी तसेच मुंबई बाहेर जाणाऱ्या कामगारांसाठी अन्न व निवासाच्या मदतीसाठी १८००२२१२९२ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. मात्र, गरजवंतानी या हेल्पलाईन क्रमाकांवर संपर्क असता, लागतच नसल्यामुळे त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत संपर्क साधावा, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, कधीही संपर्क साधला असता कॉल लागतच नाहीत. त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. गरजू लोकांनी आता करावं काय हे त्यांना कळेना झाले आहे.
धारावीतील एका वस्तीत काही मजूर राहत आहेत. काम धंदा नसल्याने त्यांचे खायचे वांदे झाले आहेत. त्यामुळे त्यांनी पालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर गेले 2 ते 3 दिवस संपर्क करत आहेत. मात्र, तो क्रमांक बंद असल्याने त्यांचा अजूनही संपर्क झालेला नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पालिकेकडून लोकांना खूप मदत होत आहे असे सांगण्यात येत आहे. मात्र, या महापालिकेच्या हेल्पलाईन संपर्क क्रमांकावर संपर्क करून जर लागतच नसेल तर मग लोकांनी करायचं? यामुळे पालिकेच्या या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.