महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कुलाब्यात नागरिक रस्त्यावर; किराणा भरण्यासाठी गर्दी

सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, शहरात अनेक ठिकाणी नागरिकांनी किराणामालाच्या दुकानाबाहेर मोठ्या रांगा लावल्या आहेत. यामुळे 'सोशल डिस्टन्स'चे तीन-तेरा झाले आहे.

corona in mumbai
शहरात अनेक ठिकाणी नागरिकांनी किराणामालाच्या दुकानाबाहेर मोठ्या रांगा लावल्या आहेत.

By

Published : Mar 25, 2020, 7:18 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी 21 दिवसांसाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन घोषित केले आहे. यानंतर देशभरात ठिकठिकाणी नागरिकांनी अत्यावश्यक सेवांसाठी गर्दी केलीय. लॉकडाऊन दरम्यान सर्वत्र अत्यावश्यक सेवा उपलब्ध राहणार आहेत. मात्र, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातच सोशल मीडियावरून होणाऱ्या व्हायरल मेसेजेसमुळे यामध्ये भर पडलीय.

शहरात अनेक ठिकाणी नागरिकांनी किराणामालाच्या दुकानाबाहेर मोठ्या रांगा लावल्या आहेत.

सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा सुरू राहाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, शहरात अनेक ठिकाणी नागरिकांनी किराणामालाच्या दुकानाबाहेर मोठ्या रांगा लावल्या आहेत. यामुळे 'सोशल डिस्टन्स'चे तीन-तेरा झाले आहे.

नागरिकांनी घराबाहेर पडू नये, पाच पेक्षा अधिक जणांनी एकत्र येऊ नये, असे आदेश असताना देखील कुलाबा परिसरातील सहकार भांडार जवळ शेकडो लोक खरेदीसाठी दुकानाबाहेर गर्दी करत असल्याचे चित्र आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details