महाराष्ट्र

maharashtra

Dr Payal Tadvi Suicide Case : दोषमुक्त करण्यासाठी आरोपी डॉक्टरांनी दाखल केली सत्र न्यायालयात याचिका

By

Published : Apr 7, 2022, 8:12 PM IST

डॉ. पायल तडवी हिने तिच्या आई-वडिलांसोबत व्हाट्सअपवर बोलत असताना असे म्हटले होते, की तिचे सीनियर डॉक्टरांना माझी जात कोणती आहे हे माहित नाही आहे. असे तिने तिच्या आईसोबत बोलताना म्हटले आहे. आम्हाला तडवी कोणत्या समाजातील आहे हे माहीतच नव्हते तर मग आम्ही तिला तिच्या जाती वरून तिला कशाप्रकारे तिला मी छळ शकतो, असा प्रश्न देखील यावेळी याचिकाकर्ते यांनी उपस्थित केला आहे.

पायल तडवी प्रकरण
पायल तडवी प्रकरण

मुंबई -नायर हॉस्पिटलमधील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या दोन डॉक्टरांनी मुंबई सत्र न्यायालयात हे प्रकरण दोषमुक्त काढण्याकरिता आज याचिका दाखल केली आहे. या प्रकरणातील आरोपी डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी ही याचिका वकिलांमार्फत आज दाखल केली आहे. या याचिकेवर 18 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील आरोपी असलेल्या दोन्ही डॉक्टरांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे, की आम्ही पायल तडवीची कुठल्याही प्रकाराचे रॅगिंग केली नाही. आम्ही डॉक्टर पायल तडवी यांच्या पेक्षा सीनिअर डॉक्टर आहोत. जर एखाद्या डॉक्टरांनी त्यांच्या ज्युनिअरला काही काम सांगितले असल्यास ते रॅगिंग कसे काय होऊ शकते, असेही याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.


डॉ. पायल तडवी हिने तिच्या आई-वडिलांसोबत व्हाट्सअपवर बोलत असताना असे म्हटले होते, की तिचे सीनियर डॉक्टरांना माझी जात कोणती आहे हे माहित नाही आहे. असे तिने तिच्या आईसोबत बोलताना म्हटले आहे. आम्हाला तडवी कोणत्या समाजातील आहे हे माहीतच नव्हते तर मग आम्ही तिला तिच्या जाती वरून तिला कशाप्रकारे तिला मी छळ शकतो, असा प्रश्न देखील यावेळी याचिकाकर्ते यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेली ॲट्रॉसिटीचा गुन्हा देखील रद्द करण्यात यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली असून हे सर्व संपूर्ण प्रकरण दोषमुक्त करण्यात यावे, अशी मागणी या दोन्ही आरोपींनी केलेली आहे.

डॉ. पायलला जातीवाचक टिप्पणी करून आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी आपले उर्वरीत शिक्षण पूर्ण करण्यासाठी नायर रूग्णालयात प्रवेश करू देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली होती. मात्र तिथे शिकत असलेल्या इतर साक्षीदारांचे काय? असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने नायर रूग्णालय प्रशासनाला यावर उपाय सुचवण्याचे निर्देश जारी केले होते. त्यावर मुंबईतील अन्य पालिका रूग्णालयातने हे शिक्षण पूर्ण करता येईल. दुसऱ्या राज्यातूनही शिक्षण पूर्ण करता येईल, अशी भूमिका घेत राज्य सरकारने आरोपींच्या याचिकेस जोरदार विरोध केला होता. मात्र न्यायालयाने या तिन्ही आरोपींना शिक्षण पूर्ण करण्यास तूर्तास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता.


या प्रकरणातील तिन्ही आरोपी सध्या जामिनावर :डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहे. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना जामिनावर सोडण्यापूर्वी काही अटीच्या आधारावर त्यांना जामीन देण्यात आली होती. त्यामध्ये प्रस्तावित राहत्या घराचा पत्ता, मोबाइल नंबर देण्याचे निर्देशही आरोपींना दिले होते. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पूर्तता केल्यानंतर या सर्व आरोपींना जामिनावर कारागृहातून सोडण्यात आले होते.

काय आहे प्रकरण? :रॅगिंगला कंटाळून वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉ. पायल तडवी या तरुणीने बुधवारी आत्महत्या केली आहे. मयत तरूणी ही आदिवासी तडवी समाजाची होती. तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्यांना तत्काळ अटक करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. या मागणीकरिता आदिवासी तडवी समाजाच्या विविध संघटनांच्या वतीने जळगावात आंदोलन केले गेले. तसेच याप्रकरणी सोशल मीडियावर देखील संताप व्यक्त केला जात असून आरोपांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. डॉ.पायल नायर रुग्णालय मुंबईमध्ये शिक्षण घेत होती. 1 मे 2018 रोजी तीला मागासर्गीय राखीव जागेवर प्रवेश मिळाला होता. यानंतर रुग्णालयात सीनिअर असलेल्या डॉ. हेमा आहूजा, डॉ. भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी सतत तिचा छळ केला. तिने मागासवर्गीय आरक्षित जागेवर प्रवेश मिळवला म्हणून तिला जातीवाचक टोचून बोलत होते. याबाबत तरुणीने वारंवार डीनकडे तक्रार देखील केली होती. पण तरीसुद्धा त्याची योग्य दखल घेण्यात आली नाही. पायलच्या आईने देखील या घटनेआधी नायर रुग्णालयाच्या डीनला पत्र लिहून याबाबत कळविले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details