महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : 'दोन दिवसात तोडगा न काढल्यास एक जूनपासून नायर रुग्णालय बंद करू' - डॉक्टर

पायल तडवी या वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. यानंतर विद्यार्थ्यांनी नायर महाविद्यालयासमोर आंदोलन केले. आज पायलच्या परिवाराने आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोन दिवसात आरोपींवर कारवाई न केल्यास नायर रुग्णालय बंद करण्याचा इशारा दिला.

आंदोलन करताना विद्यार्थी

By

Published : May 28, 2019, 5:42 PM IST

मुंबई- डॉक्टर पायलच्या परिवाराने आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यासह नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने दोन दिवसात या प्रकरणावर तोडगा काढावा, अशी विनंतीही त्यांनी केली. अन्यथा तोडगा न निघाल्यास एक जूनपासून नायर रुग्णालय बंद करू, असा इशाराही त्यांनी दिला.

आंदोलन करताना विद्यार्थी


आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांनी देखील पोलीस प्रशासन व रुग्णालय प्रशासनाला तसे आदेश द्यावेत, अन्यथा राजिनामा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी यावेळी केली. डॉक्टर पायल तडवी प्रकरणी रुग्णालय प्रशासनाच्या व्यवस्थापक दोषी आहेत. त्यांच्यावर देखील कारवाई करा, या मागणीसाठी आज देखील नायर रुग्णालयाबाहेर सामाजिक संस्थांनी निदर्शने केली. संबंधित आरोपींना नायर रुग्णालयातील प्रशासनाची फूस आहे. पोलीस अजूनपर्यंत कारवाई का करत नाही, असा देखील त्यांनी सवाल यावेळी उपस्थित केला. रुग्णालयात डॉक्टर पायल यांचे कुटुंब व सामाजिक कार्यकर्ते आरोग्यमंत्री व विद्यार्थ्यांनी चौकशी समितीची भेट घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details