महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अनुराग कश्यप अडचणीत, अभिनेत्री पायल घोषने लैंगिक छळाची दाखल केली तक्रार - पायलने लैंगिक छळाची तक्रार केली दाखल

अभिनेत्री पायल घोषने निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला होता. पायलने अखेर ओशिवरा पोलीस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे. ओशिवरा पोलीस आता पायलचा जबाब नोंदवत असल्याची माहिती तिचे वकील नितीन सातपुते यांनी दिली.

complaint against anurag kashyap
पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात लैंगिक छळाचा दाखल केली तक्रार

By

Published : Sep 22, 2020, 10:45 PM IST

Updated : Sep 25, 2020, 2:44 PM IST

मुंबई -प्रसिद्ध अभिनेत्री पायल घोष हिने बॉलिवूडचे प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्याविरूद्ध मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्री पायल घोष वकील नितीन सातपुते यांच्यासह अनुराग कश्यपविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात आली होती. अ‍ॅड. नितीन सातपुते म्हणाले, की आयपीसीच्या कलम 376,354, 341, 342 अन्वये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात लैंगिक छळाचा दाखल केली तक्रार
अभिनेत्री पायल घोषने नुकताच असा आरोप केला होता, की अनुराग कश्यपने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. पायल घोष हिच्या आरोपानंतर बॉलिवूड दोन गटात विभागले गेले आहे. पायल घोषच्या या वक्तव्यानंतर अभिनेत्री कंगना रनौत पायल घोषच्या बाजूने उभी आहे, तर अनुराग कश्यपच्या समर्थनार्थ अनेक सेलेब्रिटीही पुढे येत आहेत. 'पटेल की पंजाबी शादी' चित्रपटातील अभिनेत्री पायल घोषने सांगितले, की ती तिच्या मॅनेजरसह अनुराग कश्यपला भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेली होती. पहिल्या दिवशी अनुराग कश्यप यांची वर्तणूक चांगली होती. दुसर्‍याच दिवशी अनुराग कश्यपने तिला पुन्हा घरी बोलावले, जिथे पायलला अस्वस्थता जाणवली. एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ही घटना घडली होती. या आधी पायल घोषने सोमवारी मुंबईतील ओशिवारा ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होती. परंतु त्यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस हद्दीच्या मुद्द्यावरून तक्रार दाखल करण्यात अडथळे आले.
Last Updated : Sep 25, 2020, 2:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details