महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pawar Support to Mamata - Fadnavis : काँग्रेसला बाजूला ठेवून मोट बांधण्यात ममतांना पवारांची साथ - फडणवीस

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ( Mamata Banerji Maharashtra visit ) ममता बॅनर्जी मुंबईत आल्या त्या राजकीय अजेंडा घेऊनच. भाजप विरोधकांची मोट बांधायची आणि तेही (keeping the Congress aside) काँग्रेसला बाजूला ठेवून. हा ममतांचा प्रयत्न आहे, आणि त्याला शरद पवारांची साथ असल्याचे त्यांच्या या दौऱ्यानंतर स्पष्ट झाले आहे. असा दावा (Devendra Fadnavis) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Fadnavis
फडणवीस

By

Published : Dec 2, 2021, 4:14 PM IST

मुंबई: मुंबई आणि महाराष्ट्रात नेहमीच वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री येत असतात. इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांचे आम्ही नेहमीच स्वागत केले. मात्र आता अन्य राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या स्वागताबद्दल दुटप्पी भूमिका घेतली जात आहे. ममता बॅनर्जी ( Mamata Banerji Maharashtra visit ) यांचे स्वागत राजशिष्टाचार मंत्री करतात मात्र भूपेन पटेल आणि योगी आदित्यनाथ यांचे स्वागत होत नाही हा दुटप्पीपणा आहे. कोणत्याही मुख्यमंत्र्यांना येऊन आपल्या विकासाबाबत बोलण्याचा अधिकार आहे. मात्र ममता बॅनर्जी या केवळ राजकीय अजेंडा घेऊनच आल्या होतया, असेही फडणवीस म्हणाले.

फडणवीस प्रतिक्रीया

शिवसेनेचे बेगडी सावरकर प्रेम

शिवसेनेचे सावरकर प्रेम हे वेगळी असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सावरकर यांच्याबाबतीत आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळे आज शिवसेनेचे खासदार हे सावरकरांचा अपमान करत असल्याचे स्पष्ट झाल्याने शिवसेनेचे सावरकर प्रेम किती बेगडी आहे हे सुद्धा समोर आले आहे असेही फडणवीस यांनी म्हणले आहे. परमबीर सिंग यांच्या निलंबनाबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला असेल आणि तो गृहमंत्र्यांना माहीत नसेल तर आश्चर्य आहे. याबाबत आपण गृहमंत्र्यांना विचारले पाहिजे कारण माझा काळात मी गृहमंत्री असताना सर्व निर्णय मला माहित होते. असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

हेही वाचा -Ajit Pawar slammed BJP : परराज्यातील मुख्यमंत्री उद्योग पळविण्यासाठी येतात का ? अजित पवारांचा भाजपला सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details