महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पवार कुटुंबीयांची बारामतीमधील एकत्रित दिवाळी यंदा रद्द; दिलगिरी केली व्यक्त - पवारांची बारामतीमधील दिवाळी

बारामतीमधील दिवाळी यंदा एकत्रित न साजरी करण्याचा पवार कुटुंबियांचा निर्णय घेतला आहे. बारामती येथे परंपरेनुसार दरवर्षी होणारा सामूदायिक दिवाळी उत्सव तसेच पाडव्याचा स्नेहभेटीचा पारंपरिक कार्यक्रम कोरोनामुळे यावर्षी रद्द करावा लागत आहे. त्याबद्दल पवार कुटुंबीयांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

not to celebrate Diwali together
बारामतीमधील एकत्रित दिवाळी यंदा रद्द

By

Published : Nov 9, 2020, 4:43 PM IST


मुंबई- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबातील सर्व सदस्य बारमतीतील गोविंदबाग या निवास्थानी एकत्रित येऊन येऊन दिवाळी सण साजरा करतात. यंदा मात्र, परंपरेनुसार दरवर्षी बारामतीत साजरा होणारा दिवाळीचा सण तसेच दिवाळी पाडव्याला होणाऱ्या हितचिंतकांच्या स्नेहभेटी, शुभेच्छांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा सामूहिक दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय पवार कुटुंबीयांनी घेतला आहे.

पवार कुटुंबीयांची दिलगिरी-

दरवर्षी दिवाळीत भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सहकाऱ्यांनी, हितचिंतक बंधु-भगिनींनी यंदा बारामतीला न येता आपापल्या घरुनच शुभेच्छा द्याव्यात. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत आपापल्या घरीच सुरक्षित दिवाळी साजरी करावी. कोरोनाला हरवल्यानंतर पुढची दिवाळी मात्र, पारंपरिक उत्साहात, जल्लोषात बारामतीला एकत्रित येऊन साजरी करुया, असे विनंतीवजा आवाहन पवार कुटुंबीयांच्या वतीने राज्यातील जनतेला व हितचिंतक बंधु-भगिनींना करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि पवार कुटुंबीयांच्यावतीने संयुक्त निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. बारामती येथे परंपरेनुसार दरवर्षी होणारा सामूदायिक दिवाळी उत्सव तसेच पाडव्याचा स्नेहभेटीचा पारंपरिक कार्यक्रम कोरोनामुळे यावर्षी रद्द करावा लागत आहे. त्याबद्दल पवार कुटुंबीयांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

इच्छा असूनही यंदा भेटता येणार नाही-

दरवर्षी दिवाळीला पवार कुटुंबीय बारामतीत येऊन बारामतीकरांसह एकत्रितपणे दिवाळी साजरा करतात. पाडव्याला राज्यभरातून लाखो सहकारी, हितचिंतक बंधु-भगिनी बारामतीत येऊन पवार कुटुंबीयांना भेटतात. दिवाळीच्या शुभेच्छा देतात. हा कार्यक्रम सर्वांचा आनंद, उत्साह वाढवणारा असतो. आस्था, आपुलकी, स्नेहपूर्ण वातावरणात होणाऱ्या या कार्यक्रमाची ओढ आपल्या सर्वांनाच असते. परंतु, कोरोना संकटकाळात नागरिकांच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी अनेक दशकांची सामूहिक दिवाळीची परंपरा यंदा खंडीत करावी लागत आहे. त्यामुळे इच्छा असूनही यंदा भेटता येणार नाही, याचे दु:ख निश्चितच आहे. परंतु, कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करायचे आहे. तसेच कोरोनाला लवकरात लवकर हरवण्याचा निर्धार असल्याने आपल्याला यावर्षी एकत्र येता, भेटता येणार नाही, हे समजून घेतले पाहिजे, अशी विनंतीही त्यांनी या निवेदनातून केली आहे.

संयम आणि नियम पाळावे

कोरोनाला हरवण्यासाठी आणखी काही काळ संयम आणि नियम पाळावे लागतील. त्यामुळे यंदाची दिवाळी आपण सर्वांनी आपापल्या घरी, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन सुरक्षितपणे साजरी करुया. स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला सुरक्षित ठेवूया, असे आवाहन करीत समस्त पवार कुटुंबीयांनी राज्यातील जनतेला संयुक्त निवेदनाद्वारे दिवाळीच्या, नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details