मुंबई पत्रा चाळ जमीन प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांना ईडीने आज चौकशीसाठी बोलावले आहे. याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.
Patra Chawl land case साक्षीदार स्वप्ना पाटकरांना ईडीचे चौकशीसाठी समन्स, आज बोलावले - साक्षीदार स्वप्ना पाटकरांना ईडीचे चौकशीसाठी समन्स
06:23 August 23
स्वप्ना पाटकरांना ईडीचे चौकशीसाठी समन्स
पाटकर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली होती. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी फोन करून पाटकर यांना शिवीगाळ केली मारण्याची धमकी दिली. असा आरोपही सपना पाटकर यांनी संजय राऊत यांच्यावर केलेला आहे.
सपना पाटकर या चित्रपट दिग्दर्शक आहेत. या सुजित पाटकर यांच्या पत्नी आहे. सपना पाटकर यांचा आरोप आहे की, संजय राऊत यांनी त्यांना शिवेगाळ केली. अश्लील भाषेत संभाषण केले आणि त्यांना मारण्याची धमकी दिली. याबाबतीत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी देखील संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार तक्रार केली होती.
काय आहे पत्राचाळ घोटाळामुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा म्हाडा भूखंड आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा 1034 कोटी रुपयांचा आहे. पत्राचाळमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली. तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. ही चाळ विकसित करण्याचे कत्रांट महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन 3 हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती. हे फ्लॅट 47 एकर जागेवर बांधले जाणार होते. मात्र, गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने तसे केले नाही. कंपनीने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा एमएचडीएला फ्लॅटही दिला नाही. कंपनीने ही जमीन अन्य 8 बिल्डरांना 1034 कोटी रुपयांना विकली. हे दोन्ही घोटाळे करणाऱ्या एचडीआयएलचे संचालक प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवन आहेत.
ईडीने प्रवीणला पकडले, तेव्हा संजय राऊतचे नाव समोर आले. प्रवीण हा शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मित्र आहे. प्रवीणच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 83 लाखांचे कर्जही दिले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. तपास सुरू झाल्यावर वर्षा यांनी प्रवीणच्या पत्नीला 55 लाख रुपये परत केले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी सुजित पाटकर याचाही संजय राऊतशी संबंध आहे. सुजित हा संजय यांच्या मुलीच्या फर्ममध्ये भागीदार आहे. सुजितची पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने मिळून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ही जमीनही घोटाळ्याच्या पैशातून घेण्यात आली होती.
TAGGED:
Patra Chawl land case