मुंबई - कथित पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांना अटक करण्यात आली. आज त्यांची कोठडी संपत असल्याने न्यायालयात हजर करण्यात आलं होते. तेव्हा सत्र न्यायालयाने संजय राऊतांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यातच आता संजय राऊत ईडीने केलेल्या कारवाईविरोधात पुस्तक लिहत असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे राऊत यांच्या या पुस्तकांमध्ये काय नवीन खुलासे ईडी विरोधात करण्यात येतात हे महत्त्वाचं असणार shivsena leader sanjay raut writing book in jail over ed action आहे.
संजय राऊत यांनी न्यायालयात हजर करण्यात आलं होते. त्यापूर्वी संजय राऊत बराच वेळ न्यायालयाच्या बाहेर थांबले होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की, त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या केसवर पुस्तक लिहीत आहेत. सगळी केस खोटी आहे, माझा काही संबंध नाही. प्रवीण राऊत माझे नातेवाईक फक्त दोन जणांना ओळखतो. 'सच के साथ लढ सकते हैं झूट के साथ नहीं.' मला जेलच्या आंत मध्ये नियमानुसार वृत्तपत्र मिळतात आहे. तसेच, मी स्वस्थ आहे, काहीच त्रास नाही, असे देखील संजय राऊत यांनी न्यायालयाच्या परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक रित्या गप्पा मारताना म्हटलं आहे.