मुंबई -केंद्र सरकारने सशस्त्र दलात भरतीसाठी जाहीर केलेल्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये तिसऱ्या दिवशीही निदर्शने सुरू आहेत. या निदर्शन होणाऱ्या विभागात जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या जात आहेत. मुंबईमधून बिहारला जाणारी पहिली गाडी रद्द करण्यात आली आहे. आज रात्री बिहारला जाणारी पाटलीपुत्र एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. यामुळे बिहारमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा फटका बसला आहे.
Agnipath Scheme Protest - मुंबईहून बिहारला जाणारी पाटलीपुत्र एक्सप्रेस रद्द - अग्निपथ आंदोलन रेल्वे गाड्या रद्द
केंद्र सरकारने सशस्त्र दलात भरतीसाठी जाहीर केलेल्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये तिसऱ्या दिवशीही निदर्शने सुरू आहेत. या निदर्शन होणाऱ्या विभागात जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या जात आहेत.
पाटलीपुत्र एक्स्प्रेस रद्द -मुंबईत कोणीही आले तरी ते आपले पोट भरू शकतात. यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक मुंबईत येतात. या नागरिकांना आपल्या गावाला जाण्यासाठी ट्रेनच्या एक्प्रेसला प्राथमिकता देतात. सध्या देशभरात सैन्य भरतीच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. यामुळे देशभरातील अनेक ठिकाणाहून आंदोलन होणाऱ्या विभागातील ट्रेन सेवा खंडित करण्यात आली आहे. याचा फटका मुंबईमध्ये राहणाऱ्या बिहारच्या नागरिकांना बसला आहे. आज रात्री कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी 12141 पाटलीपुत्र एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. ही एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून पाटलीपुत्रसाठी रात्री ११.३५ वाजता सुटते. बिहारला जाणारी ही महत्वाची एक्स्प्रेस असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
बिहारमध्ये ट्रेनच्या 10 बोगी जाळल्या :बिहारमध्ये 19 जिल्ह्यांमध्ये निदर्शने झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. येथे अनेक ठिकाणी निदर्शनांना हिंसक वळण लागले आहे. लखीसरायमध्ये ट्रेनच्या 10 बोगींना आग लावण्यात आली. हाजीपूर स्थानकाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. बेतिया येथेही तोडफोड झाली. बक्सरमध्ये विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅकवर निदर्शने केली. येथे डुमराव रेल्वे स्थानकाच्या अप आणि डाऊन मार्गावर जाम झाला होता. दिल्ली-कोलकाता रेल्वे मुख्य रस्ता ठप्प झाल्याने अनेक गाड्या तासन्तास अडकून पडल्या होत्या. सैन्य भरतीच्या नव्या नियमाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी पहाटे पाच वाजल्यापासून रेल्वे रुळावर बसून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. शुक्रवारी सकाळी समस्तीपूरमध्ये आंदोलकांनी जम्मू तवी-गुवाहाटी एक्सप्रेस ट्रेन पेटवून दिली. ट्रेनच्या दोन बोगी जळून राख झाली. आराच्या बिहिया स्टेशनवर जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे.