महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Epidemic in Mumbai : नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले - मुंबईत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले

कोरोना नियंत्रणात असताना मुंबईत साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापेक्षा दुसऱ्या आठवड्यात मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोच्या (malaria, dengue, gastro) रुग्ण संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच ७ ते १४ नोव्हेंबर दरम्यान साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

Epidemic in Mumbai
Epidemic in Mumbai

By

Published : Nov 16, 2021, 5:01 PM IST

मुंबई - मुंबईत गेले दीड वर्ष कोरोनाविषाणूचा प्रसार असून तो सध्या नियंत्रणात आला आहे. कोरोना नियंत्रणात असताना मुंबईत साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. (Epidemic in Mumbai) नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापेक्षा दुसऱ्या आठवड्यात मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोच्या (malaria, dengue, gastro) रुग्ण संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाला हरवण्यासाठी ज्या पद्धतीने खबरदारी घेतली त्याचप्रमाणे साथीच्या आजार रोखण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात रुग्ण वाढले -

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत साथीचे आजार आटोक्यात आल्याचे समोर आले होते. यामध्ये मलेरियाचे ७२ रुग्ण, लेप्टोचे १, डेंग्युचे ४७, गॅस्ट्रोचे ४९, हिपेटायटिसचे ६, चिकनगुनियाचे ६ आणि ‘एच १एन १’चा १ रुग्ण आढळला होता. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच ७ ते १४ नोव्हेंबर दरम्यान साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मलेरियाचे ८०, डेंग्यू २३, गॅस्ट्रो ७२, चिकनगुनिया ७ आणि लेप्टोचे ४ रुग्ण आढळले आहेत. ऑक्टोबरमध्ये मलेरियाचे ५७६ रुग्ण, लेप्टोचे ३१, डेंग्युचे २५४, गॅस्ट्रोचे २४७, हिपेटायटिसचे ४१, चिकनगुनियाचे ३३ आणि ‘एच१एन१’चे ८ रुग्ण आढळले होते.

काळजी घ्या -


गेल्या दीड वर्षोपासून मुंबईकर कोरोनाविरोधात लढा देत आहेत. मुंबईकर नागरिकांची साथ आणि योग्य उपचार पद्धती यामुळे कोरोनाच्या दोन्ही लाटा रोखण्यात पालिकेला यश आले आहे. परंतु पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांमुळे मुंबईकरांपुढे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोनाला हरवण्यासाठी ज्या पद्धतीने खबरदारी घेतली त्याचप्रमाणे साथीच्या आजार रोखण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details