महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईतील परिस्थिती चिंताजनक; ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचे सलग तिसऱ्या दिवशी स्थलांतर - मुंबई ऑक्सिजन पुरवठा स्थिती न्यूज

ऑक्सिजनचा शनिवारी  तुटवडा निर्माण झाल्याने महानगरपालिकेच्या मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालयमधून 18 रुग्णांना मुलुंड जम्बो कोविड सेंटर आणि राजावाडी येथे हलवण्यात आले. ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने येथे ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जात नाही.

Mumbai corporation hospital
मुंबई मनपा रुग्णालय

By

Published : Apr 19, 2021, 2:03 AM IST

Updated : Apr 19, 2021, 2:15 AM IST

मुंबई-कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयांत हलवावे लागत आहेत. सलग तिसऱ्या दिवशी ही मुंबईत स्थिती दिसून आली आहे.

मुंबईत ऑक्सिजन नसल्याने रुग्णालयांमध्ये बिकट परिस्थिती तयार झाली आहे. रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक व आरोग्य यंत्रणेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

मुंबईतील परिस्थिती चिंताजनक

ऑक्सिजनची रुग्णालयांना गरज-

मुंबई महानगरपालिकेच्या सहा रुग्णालयांमधील १६८ रुग्णांना ऑक्सिजची सोय तातडीने उपलब्ध व्हावी यासाठी शनिवारी इतर कोविड रुग्णालय, कोविड केंद्रामध्ये हलवण्यात आले होत. यात मुलुंडमधील एम. टी. अग्रवाल रुग्णालयाचादेखील समावेश आहे. या रुग्णालयात रविवारीदेखील तीच परिस्थिती कायम होती. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता होती. ऑक्सिजनचा शनिवारी तुटवडा निर्माण झाल्याने महानगरपालिकेच्या मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालयमधून 18 रुग्णांना मुलुंड जम्बो कोविड सेंटर आणि राजावाडी येथे हलवण्यात आले. ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने येथे ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जात नाही.

हेही वाचा-मुंबई- रुग्णालयांना मागणीप्रमाणे १४९ ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा


रेमडेसिवीरचाही तुटवडा-

अग्रवाल रुग्णालयातील नॉन कोविड रुग्णालादेखील याचा फटका बसत आहे. कारण ऑक्सीजन असल्याने त्यांनाही दुसरीकडे हलवावे लागत आहे. ऑक्सिजन बेड मिळाला तर रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही, अशी बिकट परिस्थिती मुंबईत निर्माण झाली आहे.

हेही वाचा-केंद्राकडून राज्याला रेमडेसिवीर अन् ऑक्सिजनबाबत सहकार्य नाही - मंत्री अस्लम शेख


अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी कलर कोड लागू

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांना वाहतूक कोंडीची अडचण होऊ नये, याकरिता मुंबई पोलिसांनी तीन रंगाचे स्टिकर वाटण्यास सुरुवात केली आहे. पिवळा, लाल आणि हिरव्या रंगाचे स्टिकर वाहनांना लावण्यात येत आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना वाहतूक कोंडीत थांबण्याची गरज भासणार नाही. लाल रंगाचे स्टिकर वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी असेल. हिरव्या रंगाचे स्टिकर भाजीपाल्यासारख्या जीवनावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी तर पिवळा रंग अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या वाहनांसाठी असणार आहे.

दरम्यान, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेल्या रुग्णालयांनी मुंबई महापालिकेकडे ऑक्सिजन सिलिंडरची मागणी केली होती. त्याप्रमाणे 5 रुग्णालयांना 149 ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी दिली आहे.

Last Updated : Apr 19, 2021, 2:15 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details