महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Special Court : अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण, ख्रिस्ती धर्मगुरूला जन्मठेपेची शिक्षा - मुंबई सत्र न्यायालय

अल्पवयीन मुलाचं लैगिंक शोषण करणाऱ्या धर्मगुरूला जन्मठेपेची शिक्षा ( Pastor Life Imprisonment Mumbai Special Court ) सुनावण्यात आली आहे. 2015 मधील हे प्रकरण असून, जॉन्सन लॉरेन्स असे या फादरचे नाव आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पॉक्सो कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Dec 30, 2021, 5:15 PM IST

Updated : Dec 30, 2021, 6:35 PM IST

मुंबई :अल्पवयीन मुलाचं लैगिंक शोषण करणाऱ्या धर्मगुरूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात ( Pastor Life Imprisonment Mumbai Special Court ) आली आहे. 2015 मधील हे प्रकरण असून, जॉन्सन लॉरेन्स असे या फादरचे नाव आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पॉक्सो कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

काय आहे प्रकरण?

अल्पवयीन 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात न्यायालयाने निर्णय दिला आहे. आरोपी फादर जॉन्सन लॉरेन्सनं आपल्यावरील सर्व आरोप कोर्टात फेटाळून लावले होते. मात्र सरकारी पक्षानं कोर्टात मुलाची तपासणी करणाऱ्या डॉक्टरसह नऊ अन्य साक्षीदार आणि अन्य पुरावे सादर करत फादरवरील आरोप सिद्ध केले.

याबाबात सविस्तर माहिती अशी की, पीडित मुलगा हा ऑगस्ट 2015 मध्ये चर्चमध्ये नियमित प्रार्थनेसाठी जात होता. तेव्हा आरोपी फादरने मुलाला अनेकवेळा सर्वजण गेल्यावर एकट्यास थांबवले होते. पीडित मुलगा गरीब कुटुंबातून होता. चर्चमधून मिळणाऱ्या मदतीवर परिणाम होईल या भितीने त्याने ही बाब कोणाला सांगितली नाही. परंतु, त्यानंतर त्याच्या मानसिकतेवर या गोष्टींचा परिणाम होऊ लागला. तो एकटा एकटा आणि शांत राहू लागला पुढे त्याची तब्येतही नाजूक राहू लागली आणि त्याला रूग्णालयात दाखल करावे लागले होते.

दरम्यान, 27 नोव्हेंबर रोजी मुलगा आपल्या कुटुंबासोबत पुन्हा चर्चमध्ये गेला असता, आरोपी फादरने त्याला एक बॉक्स आपल्या ऑफिसमध्ये जाऊन ठेवण्यास सांगितला. त्यापाठोपाठ आरोपी फादरही तिथे गेला. तेव्हा पुन्हा त्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले गेले. घरी गेल्यावर ही गोष्ट मुलाने आपल्या आईला सांगितली आणि नंतर आईवडिलांनी पोलिसांत फादरविरुध्द तक्रार दाखल केली.

Last Updated : Dec 30, 2021, 6:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details