मुंबई - तिहेरी तलाक विरोधी विधेयक संसदेत पारित झाल्याने आजचा दिवस हा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. मुस्लीम महिलांवर तिहेरी तलाकच्या माध्यमातून होणारा अन्याय थांबेल. खऱ्या अर्थाने आज मुस्लीम महिलांना स्वातंत्र्य मिळाले आहे, असे मत महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले. हा महिलांचा विजय आहे, यासाठी सरकारचेही अभिनंदन केले पाहिजे. असेही त्या पुढे म्हणाल्या.
तिहेरी तलाक विरोधी विधेयक पारित होणे हा सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखा दिवस - तृप्ती देसाई
तिहेरी तलाक विरोधी विधेयक संसदेत पारित झाल्याने आजचा दिवस हा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असे मत तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.
तिहेरी तलाक विरोधी विधेयकावर तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया
भुमाता ब्रिगेड या महिलांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत. या संस्थेच्या माध्यमातून त्या महिलांच्या हक्कांसाठी लढत असतात.