महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Local Train Running Late : मध्य रेल्वेमुळे रोजच लेट मार्क, उशिरा धावणाऱ्या ट्रेनमुळे प्रवासी संतप्त - Local Train Running Late

मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून रेल्वेची ओळख आहे. या रेल्वेने लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, गेले महिनाभराहून अधिक काळ रेल्वे अर्धा ते एक तास उशिराने धावत आहे ( Local Train Running Late ). यामुळे लांबून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कामावर पोहोचण्यास रोजच उशीर होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. रेल्वेने प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन आपल्या सेवेत सुधारणा करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Feb 26, 2022, 9:02 PM IST

मुंबई- मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून रेल्वेची ओळख आहे. या रेल्वेने लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, गेले महिनाभराहून अधिक काळ रेल्वे अर्धा ते एक तास उशिराने धावत आहे ( Local Train Running Late ). यामुळे लांबून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कामावर पोहोचण्यास रोजच उशीर होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. रेल्वेने प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन आपल्या सेवेत सुधारणा करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी

ठाणे ते दिवा नवी मार्गिका -मुंबईची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मध्य रेल्वेवर कसारा, कर्जत, खोपोलीपर्यंत तर हार्बर मार्गावर पनवेलपर्यंत धावते. यामधून लाखो प्रवासी प्रवास करतात. विशेष करून मुंबईच्या बाहेरून म्हणजेच कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर, कसारा, कर्जत आदी परिसरातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या प्रवाशासाठी काही मोजक्याच रेल्वे चालवल्या जातात. यामुळे याच लोकल रेल्वे पकडून मुंबईत येणे हा एकमेव पर्याय या प्रवाशांना असतो. या विभागातील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ठाणे ते दिवा दरम्यान नवीन ट्रॅक टाकले आहेत. या मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

रोजच लेट मार्क प्रवासी त्रस्त -ठाणे ते दिवा नवीन मार्गाचे काम सुरू असल्याने वेळोवेळी मेगाब्लॉक ( Megablock ) घेण्यात आला आहे. या मार्गाचे काम संपल्यावर लोकल रेल्वे ट्रायलसाठी चालवण्यात आल्या. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंबरनाथ, बदलापूर या ठिकाणचा प्रवास सुमारे पन्नास मिनिटे उशिरा होत होता. यानंतर या मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतरही लोकल रेल्वे अर्धा तास ते पन्नास मिनिटे उशिराने धावत आहे ( Local Train Running Late ). यामुळे नोकरीवर जाणाऱ्यांना रोजच उशीर होत आहे. मध्य रेल्वेच्या कारभारामुळे उशीर होत असल्याने रोजच लेटमार्क लागत आहे. रोजच्या लेटमार्कमुळे प्रवासी त्रस्त झाले असून मध्य रेल्वेने वेळेवर लोकल ट्रेन चालवून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्याशी संपर्क साधला असता रोजच इतक्या उशिरा ट्रेन धावत नाहीत. एखाद्यावेळी लोकल ट्रेन खोळंबली असल्यास उशीर झाला असावा, अशी प्रतिक्रिया दिली.

असा झाला उशीर -२६ फेब्रुवारी सकाळी १०.४२ ची बदलापूर ते सीएसमटी फास्ट लोकल ११.३६ वाजता कल्याण रेल्वे स्थानकात पोहोचली. हे ५ स्थानकाचे अंतर कापायला रेल्वेला सुमारे १ तास लागला. ११.५३ ला दिवा, १२.२३ ला घाटकोपर, १२.३७ ला दादर, १२.४२ ला भायखळा तर वाजता ही रेल्वे सीएसमटी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहचली. १२.११ वाजता ही ट्रेन पोहचणे अपेक्षित आहे. मात्र ती १२.५३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचली. म्हणजेच ५१ मिनिटे उशिरा पोहोचली आहे. हा प्रकार रोजच होत असल्याने प्रवासी संतप्त झाले ( Passengers is Aggressive ) आहेत.

हेही वाचा -Lavasa Project : शरद पवार, सुप्रिया सुळेंना लवासा प्रकल्पात स्वारस्य होतं हे स्पष्ट दिसतंय - मुंबई उच्च न्यायालय

ABOUT THE AUTHOR

...view details