महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांनी आवश्यक काळजी घ्या, लक्षणे आढळल्यास वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधा - बीएमसी - ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांनी काळजी घ्या

‘सार्स कोविड २’ या विषाणूचा नवीन प्रकार आढळला असून त्याचा वेगाने प्रसार होत असल्याची माहिती प्राप्त होत आहे. मागील सुमारे एक महिन्याच्या कालावधीमध्ये युकेमधून मुंबईत आलेल्या नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, तसेच कोरोना विषयक लक्षणे आढळली तर त्वरेने वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधावा, असे आवाहन बीएमसी प्रशासनाने केले आहे.

Ward War Room
ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांनी आवश्यक काळजी घ्या

By

Published : Dec 23, 2020, 9:05 PM IST

मुंबई - इंग्लंड (युनायटेड किंग्डम/ युके) या देशात ‘सार्स कोविड २’ या विषाणूचा नवीन प्रकार आढळला असून त्याचा वेगाने प्रसार होत असल्याची माहिती प्राप्त होत आहे. मागील सुमारे एक महिन्याच्या कालावधीमध्ये युकेमधून मुंबईत आलेल्या नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, तसेच कोरोना विषयक लक्षणे आढळली तर त्वरेने वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

  • इंग्लंड (युनायटेड किंग्डम / युके) या देशात ‘सार्स कोविड – २’ या विषाणूचा नवीन प्रकार वेगाने फैलावतो आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत आणि सुनिश्चित कार्यपद्धती देखील ठरवून देण्यात आली आहे. या नवीन प्रकारच्या विषाणुचा प्रसार मुंबईमध्ये होऊ नये, यासाठी प्रभावी साथरोग नियंत्रणाकरिता इंग्लंडमधून येणाऱ्या प्रवाशांकरिता केंद्र व राज्य सरकारच्या धर्तीवर विविध मार्गदर्शक सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेने देखील यापूर्वीच निर्गमित केल्या असून त्या अंमलात आल्या आहेत. याअनुषंगाने जे नागरिक इंग्लंडमधून दिनांक २५ नोव्हेंबर २०२० पासून म्हणजे एक महिना कालावधीमध्ये मुंबईत आलेले आहेत, त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष काळजी घ्यावी तसेच वॉर्डरूमशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

    .. या नियमांचे पालन करा -
    १) युकेमधून परतलेल्या नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधावा. तसेच कौटुंबिक वैद्यकीय सल्लागार (फॅमिली डॉक्टर)/नजीकच्या महानगरपालिका दवाखाने/आरोग्य केंद्र यांच्याकडे प्राथमिक वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.

    २) युकेमधून परतलेल्या नागरिकांनी शंका दूर करण्यासाठी कोविड १९ चाचणी करुन घ्यावी. तसेच मास्कचा सुयोग्य वापर, हातांची नियमित स्वच्छता, सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा कटाक्षाने अवलंब करावा. सोबत आपल्या कुटुंबाची देखील योग्य ती काळजी घ्यावी.

    ३) ‘कोविड – १९’ च्या अनुषंगाने कोणतेही लक्षण, जसे की, ताप, कफ, श्वास घेण्यास त्रास होणे अथवा अन्य आजारांचेही कोणतेही लक्षण विकसित झाले असल्यास घाबरुन जाऊ नये. त्वरेने महानगरपालिकेच्या ‘वॉर्ड वॉर रुम’ कडे संपर्क साधून आवश्यक ती माहिती द्यावी. वॉर्ड वॉर रुमच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करावी.

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांच्या ‘वॉर रुम’ चे दूरध्वनी संपर्क -
    ए ०२२-२२७००००७,
    बी ०२२-२३७५९०२३,
    सी ०२२-२२१९७३३१,
    डी ०२२-२३८३५००४,
    ई ०२२-२३७९७९०१,
    एफ/दक्षिण ०२२-२४१७७५०७,
    एफ/उत्तर ०२२-२४०११३८०,
    जी/दक्षिण ०२२-२४२१९५१५,
    जी/उत्तर ०२२-२४२१०४४१,
    एच/पूर्व ०२२-२६६३५४००,
    एच/पश्चिम ०२२-२६४४०१२१,
    के/पूर्व ०२२-२६८४७०००,
    के/पश्चिम ०२२-२६२०८३८८,
    पी/दक्षिण ०२२-२८७८०००८,
    पी/उत्तर ०२२-२८४४०००१,
    आर/दक्षिण ०२२-२८०५४७८८,
    आर/उत्तर ०२२-२८९४७३५०,
    आर/मध्य ०२२-२८९४७३६०,
    एल ०२२-२६५०९९०१,
    एम/पूर्व ०२२-२५५२६३०१,
    एम/पश्चिम ०२२-२५२८४०००,
    एन ०२२-२१०१०२०१,
    एस ०२२-२५९५४०००,
    टी ०२२-२५६९४०००

ABOUT THE AUTHOR

...view details