महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

देव तारी त्याला कोण मारी; रुळाखाली गेलेल्या मुलाचे प्रवाशाने वाचविले प्राण - रुळाखाली गेलेल्या मुलाचे प्रवाशाने वाचविले प्राण

काळजीपूर्वक रेल्वेला विरारच्या दिशेने 15 ते 16 मीटर हलविले. त्यानंतर मुलाला सुखरूप बाहेर काढले. प्रथमोपचार करून मुलगा रवि याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुळाखाली गेलेल्या मुलाचे प्रवाशाने वाचविले प्राण
रुळाखाली गेलेल्या मुलाचे प्रवाशाने वाचविले प्राण

By

Published : Jul 23, 2021, 3:58 AM IST

मुंबई-'देव तारी त्याला कोण मारी' या उक्तीचा प्रत्यय नुकताच वसई रोड रेल्वे स्थानकात आला. प्लॅटफॉर्म वरून चालत असताना 12 वर्षाचा लहान मुलगा तोल जाऊन दोन रेल्वे डब्याचा गॅपमधून रेल्वे रूळावर पडला. यावेळी रमेश नागर या प्रवाशाने धाडस करत रेल्वे रूळाखाली उतरून प्राण वाचवले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या वसई रोड रेल्वे स्थानकात लोकल आली होती. त्यावेळी 12 वर्षाचा मुलगा प्लॅटफॉर्मवरून चालत असताना तोल जाऊन दोन डब्यामधील गॅपमध्ये पडला. त्याचवेळी गार्डने तातडीचे ब्रेक लावून गाडी त्वरित थांबविली. परंतु दोन्ही बाजूंनी प्लॅटफॉर्म असल्याने मुलाला त्वरित काढले जाऊ शकले नाही. त्याच दरम्यान रमेश नागर या प्रवाशाने धाडस केले.

हेही वाचा-SANGLI RAIN कृष्णा नदीचे पाणी शिरले नागरी वस्तीत; 15 कुटुंबाचे तातडीने स्थलांतर

रेल्वेला विरारच्या दिशेने 15 ते 16 मीटर हलविले-

रेल्वे कर्मचाऱ्यासह प्रवासी लोकल खाली गेला. यावेळी गार्ड, आरपीएफ, जीआरपी यांच्या सहाय्याने मोटरमन, स्टेशन मास्टर यांनी मुलाची सुरक्षा सुनिश्चित केली. त्यानंतर काळजीपूर्वक रेल्वेला विरारच्या दिशेने 15 ते 16 मीटर हलविले. त्यानंतर मुलाला सुखरूप बाहेर काढले. प्रथमोपचार करून मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा-ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा; इतिहासात पहिल्यांदाच शिवलिंग पाण्याखाली!

ABOUT THE AUTHOR

...view details