महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

AC Local Train : भर उन्हाळ्यात एसी लोकल सुसाट; प्रवासी संख्या दुप्पटीने वाढली - उष्णता वाढली

मागील काही दिवसांपासून मुंबईसह उपनगर उष्णता वाढली आहे. त्यामुळे उन्हाच्या चटकेपासून बचावासाठी मुंबईकरांनी एसी लोकलकडे मोर्चा वळविला आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत एसी लोकलची प्रवासी संख्या दुप्पटीने वाढली आहे. सध्या दररोज सरासरी मध्य रेल्वेवर १९ हजार पश्चिम रेल्वे मार्गावर २१ हजार प्रवासी एसी लोकलमधून ( AC Local Train ) प्रवास करत आहे.

AC Local
AC Local

By

Published : Apr 25, 2022, 9:06 PM IST

मुंबई -गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगर उष्णता वाढली आहे. त्यामुळे उन्हाच्या चटकेपासून बचावासाठी मुंबईकरांनी एसी लोकलकडे मोर्चा वळविला आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत एसी लोकलची प्रवासी संख्या दुप्पटीने वाढली आहे. सध्या दररोज सरासरी मध्य रेल्वेवर १९ हजार पश्चिम रेल्वे मार्गावर २१ हजार प्रवासी एसी लोकलमधून ( AC Local Train ) प्रवास करत आहे.

एसी लोकलला पसंती -मुंबईत दमट हवामान त्यातच उन्हाळा आला की लोकलच्या प्रवास नकोस वाटतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी मुंबईतील एसी लोकलकडे धावत घेतात. या कालावधीत एसी लोकलच्या प्रवाशांची संख्याही वाढते. यंदात मध्य रेल्वेवर एसी लोकल फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आलेल्या आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी, २०२२ महिन्यात मध्य रेल्वेच्या एसी लोकलमधून प्रति दिवस ७ हजार ८८३ प्रवासी प्रवास करत होते. तर फेब्रुवारी महिन्यात एसी लोकलची प्रवासी संख्याही ११ हजार २२९ वर जाऊन पोहचली आहे. याशिवाय गेल्या महिन्यात दररोज १५ हजार ३५७ प्रवासी एसी लोकलमधून प्रवास करत होते. मात्र, गेल्या महिन्यापेक्षा एप्रिल महिन्या उष्णता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे आज दररोज १९ हजार ३३२ पश्चिम रेल्वे मार्गावर २१ हजार ७८५ प्रवासी एसी लोकलमधून प्रवास करत आहे.

रेल्वेचा थंडगार प्रवास मिळण्यासाठी एसी लोकल सुरू केली. मात्र, कमी फेऱ्या आणि जास्त भाडे यामुळे प्रवाशांनी एसी लोकलला पाठ दाखविली. पीक अव्हरमध्ये कोणी एसी लोकलमध्ये चढत नव्हते. त्यामुळे रिकाम्या एसी लोकल धावत होत्या. मात्र, गेल्या दोन महिन्यापासून एसी लोकलला चांगली पसंती मिळत आहे. तर, दर सोमवारी एसी लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सध्या एसी लोकलच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, टिटवाळा या सेक्शनमध्ये ४४ फेर्‍या, हार्बरच्या सीएसएमटी ते पनवेल ८ फेर्‍या, पश्चिम हार्बर मार्गावर सीएसएमटी ते गोरेगाव ८ फेर्‍या, अशा ६० फेर्‍या चालविण्यात येत आहेत.

  • प्रवासी संख्या
महिना मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे
एप्रिल १९ हजार ३३२ २१ हजार ७८५
मार्च १२ हजार ७०५ १ हजार ५३५
फेब्रुवारी ५ हजार ९३९ ११ हजार २२९
जानेवारी १ हजार ९२३ ७ हजार ८८३
  • मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकल
महिना प्रवासी संख्या महसूल
जानेवारी, 2022 59 हजार 921 24 लाख 4 हजार 135
फेब्रुवारी 1 लाख 3 हजार 422 42 लाख 83 हजार 780 रुपये
मार्च 3 लाख 93 हजार 869 1 कोटी 77 लाख 21 हजार 938 रुपये
1 एप्रिल ते 24 एप्रिल 4 लाख 63 हजार 967 2 कोटी 7 लाख 30 हजार 30 रुपये


हेही वाचा -Maharashtra Electricity Issue : महागड्या वीज खरेदीचा ग्राहकांना बसणार भुर्दंड?

ABOUT THE AUTHOR

...view details