महाराष्ट्र

maharashtra

'रिपाइं'चा निळा झेंडा देणार कंगणाला संरक्षण

अभिनेत्री असणाऱ्या कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. भारतीय राज्य घटनेने सर्वांना विचार स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे कंगनाच्या संरक्षणासाठी 9 सप्टेंबरला रिपाइंचे कार्यकर्ते सज्ज असणार आहेत.

By

Published : Sep 9, 2020, 2:13 AM IST

Published : Sep 9, 2020, 2:13 AM IST

रामदास आठवले
रामदास आठवले

मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत हिच्या संरक्षणासाठी रामदास आठवले यांचा रिपाइं पक्ष मैदानात उतरला आहे. बुधवारी 9 सप्टेंबरला कंगना मुंबईत येत आहे. तिला रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संरक्षण देण्यासाठी रिपाइंचे कार्यकर्ते निळे झेंडे घेऊन मुंबई विमानतळावर दुपारी 12 वाजल्यापासून सज्ज राहतील. तसेच कंगनाच्या घराला देखील रिपाइं कार्यकर्ते संरक्षण देतील, असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांनी सांगितले.

कंगनाने नुकताच आठवले यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि आपण महाराष्ट्राची भक्त असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कंगनाला महाराष्ट्रद्रोही म्हणण्याचा कांगावा शिवसेने ने करू नये. अभिनेत्री असणाऱ्या कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. भारतीय राज्य घटनेने सर्वांना विचार स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे कंगनाच्या संरक्षणासाठी 9 सप्टेंबरला रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, जिल्हा अध्यक्ष विवेक पवार , सिद्धार्थ कासारे, किशोर मासुम, सुमित वजाले, रतन अस्वारे यांच्या नेतृत्वात रिपाइं कार्यकर्ते मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सज्ज राहणार आहेत, अशी माहिती रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष विवेक पवार यांनी दिली.

हेही वाचा -'त्या' गाडीवर कमळ कशाला? NCB पथकाच्या गाडीवरुन नितीन राऊतांचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details