मुंबई -एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेला मोठ खिंडार पडले आहे. शिवसेनेला सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे( Uddhav Thackeray ) , आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांनी आज आंबेडकरी चळवळीच्या नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनी शिवसेनेत प्रवेश ( Sushma Andhare joins Shiv Sena ) केला. अंधारे यांच्या हाती शिवबंधन बांधताच त्यांच्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपनेते पदाची जबाबदारी सोपवली आहे. हिंदुत्वाचे दाखले देणाऱ्या भाजप, शिंदे गटांवर ( BJP Shinde group ) उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका ( Uddhav Thackeray criticizes BJP Shinde group ) केली आहे. या प्रसंगी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे, विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
असामान्य नेतृत्व तयार करण्याची वेळ - आता काही कार्यकर्ते नसलेल्या शिवसेनेचे पद वाटत आहेत. मी आपल्या खऱ्याखुऱ्या शिवसेनेचे पद वाटत आहे. अनेकांना पद, जबाबदाऱ्या दिल्या, देत असतो. दोन लढाया सुरू आहेत म्हणजे कायद्याच्या आणि दुसरी म्हणजे जनतेची. ही लढाई, हा निकाल काही फक्त शिवसेनेच्या भवितव्याचा निकाल नाही. देशात लोकशाही जिवंत आहे का? त्यावर निकाल असणार आहे. शिवसेना बाळासाहेबांनी ज्या सामान्यातून असामान्य लोक तयार केले. ते आता तिकडे गेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सामान्यातून असामान्य नेतृत्व तयार करण्याची वेळ आल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
अनेकांना शिवसेनेचे हिंदुत्व माहित नाही - सुषमा अंधारे यांच्यावर उपनेत्या पदाची जबाबदारी देत आहे. शिवसेनेसाठी चांगलं काम कराल अशी अपेक्षा आहे. अडचणीच्या काळात सुषमा अंधारे यांनी सेनेत प्रवेश केल्याने ठाकरेंनी स्तुती करताना शिंदे गटावर ठाकरी शैलीत टीका केली आहे. पूजा, अर्चा म्हणजे हिंदुत्व नाही. नीलम गोऱ्हे काही कडवट हिंदुत्ववादी नव्हत्या. पण, आज २४ वर्ष शिवसेनेसाठी काम करत आहेत. शिवसेनेत येण्यापूर्वी तीन तास गप्पा मारल्या. नंतर सेनेत प्रवेश केला. अनेकांना शिवसेनेचे हिंदुत्व माहित नाही. पूजा अर्चा करणे म्हणजे हिंदुत्व नाही. बाळासाहेबांचे हिंदुत्व वेगळं आहे, असे उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले. सुषमा अंधारे यांना सभासद नोंदणी मोहिम राबवन्यास सांगितले आहे असेही ठाकरे म्हणाले.