मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राम मंदिरासंदर्भात केलेल्या विधानाला कवडीचीही किंमत नाही. त्यांच्या विधानाचा आणि पक्षाचा तसा कोणताही संबंध नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
राम मंदिराच्या भूमिपूजन संदर्भात पार्थ पवार यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट करून पत्र जारी केले होते. त्यावर मागील काही दिवसात वाद सुरू झाला होता. एकीकडे आजोबा शरद पवार यांचा कोरोनाकाळात सुरू असलेल्या राममंदिरासाठी विरोध दर्शवला होता, तर नातू पार्थ पवारांचा राम मंदिराला पत्र काढून पाठिंबा दर्शवला होता. त्यात पार्थ यांनी राममंदिर भूमीपूजन ऐतिहासिक दिन असल्याची भावना व्यक्त केली होती. तर जय श्री रामने पत्राची सुरुवात आणि शेवटी केला होता.
हेही वाचा -ठाकरे सरकारचा कोकणी माणसांवर कसला राग?
त्यात त्यांनी राम मंदिरासाठी खूप वेळ संघर्ष चालला आणि अखेर आता राम मंदिर उभारण्यात येईल. या ऐतिहासिक दिवसाचे आपण सर्व साक्षीदार आहोत. तरुण पिढीने राम मंदिराचा संघर्ष पहिला आहे लोकशाही मध्ये अतिशय संयमाने प्रश्न सोडवला आहे. महत्त्वाचे या विजयामध्ये आपण नम्र राहिले पाहिजे. अयोध्यामध्ये असलेले रामाचे मंदिर आपल्याला आधुनिक भारतात सुद्धा रामराज्याची आठवण करून देईल, असे नमूद केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन पार्थ पवार यांनी टाकलेल्या या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते नाराज होते. परंतु उपमुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे त्यावर कोणीही भाषण करत नव्हते. मात्र, आज पवारांनी याला वाचा फोडत पार्थ पवार यांच्या विधानाला कवडीची किंमत नाही त्यांचे ते वैयक्तिक विधान होते असा खुलासा करत यावर पडदा टाकला.