महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

परभणी आगारासाठी नवीन 18 बसेस देणार; परिवहन मंत्र्यांची विधानसभेत माहिती

सध्या राज्यात सोळाशे नवीन बस गाड्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी 18 नवीन गाड्या परभणीसाठी देण्यात येणार आहे. तसेच सहा बसेस दुरूस्त करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल यांनी विधानसभेत दिली.

st bus
एसटी बस

By

Published : Mar 12, 2020, 10:18 AM IST

मुंबई - परभणी डेपोत एसटी महामंडळाची एकूण 66 वाहने उपलब्ध आहेत. सध्या राज्यात सोळाशे नवीन बस गाड्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी 18 नवीन गाड्या परभणीसाठी देण्यात येणार आहे. तसेच सहा बसेस दुरूस्त करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत दिली.

या बसेसमध्ये प्रथमोपचार साहित्य व अग्निशमन उपकरण उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी विधानसभेत दिली. परभणी आगारातील एस.टी. महामंडळाच्या बसेसच्या दुरवस्थेसंदर्भात सदस्य संजय कुटे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना परब बोलत होते.

हेही वाचा...मुंबई, पुणेसह नागपुरातही आढळले नवे रुग्ण; राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 11 वर..

परभणी आगारातील बसेस सुस्थितीत असून, यासंदर्भात अधिकारी चुकीची माहिती देत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. राज्यासाठी नवीन बसेस खरेदी करण्यात येणार असून, त्यापैकी 18 नवीन गाड्या परभणीस देण्यात येणार आहेत. गरज भासल्यास याची संख्या वाढवण्यात येईल. प्रवाशांना योग्य सेवा देण्याचा प्रयत्न एसटी महामंडळ करीत आहे, असे परब म्हणाले.

बसेस किती किलो मीटर धावल्या, याची नोंद घेण्यात येईल. नियमानुसार ठराविक कालावधीनंतर त्यांना बाद करण्यात येईल. भाडेतत्वावर इलेक्ट्रिकल वाहन घेताना वाहन चालकाचे योग्य प्रशिक्षण पूर्ण झाले आहे का, याची तपासणी करण्यात येईल. बस डेपोचे दुरूस्तीकरण सुरू असून, परमिट दिलेल्या बससंदर्भात कोणी गैरव्यवहार केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. स्कूल बससाठी प्रवास करण्याचे निकष तंतोतंत पाळण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत. अपघात होणार नाही याची काळजी शासन घेणार असल्याची माहितीही मंत्री परब यांनी यावेळी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details