महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे नवे मुंबई पोलीस आयुक्त - परमबीर सिंग यांची उचलबांगडी

सचिन वाझे प्रकरणावरून चांगलेच अडचणीत आलेल्या ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या साऱ्या पार्शभूमीवर काल मध्यरात्रीपर्यंत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठका सुरु होत्या. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची वर्णी लागली आहे.

parambir-singhs-
parambir-singhs-

By

Published : Mar 17, 2021, 5:14 PM IST

Updated : Mar 17, 2021, 6:53 PM IST

मुंबई - सचिन वाझे प्रकरणावरून चांगलेच अडचणीत आलेल्या ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सचिन वाझे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काल मध्यरात्रीपर्यंत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठका सुरु होत्या. आज मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची वर्णी लागली आहे.

भाजपने गृहमंत्री अनिल देशमुखांना हटविण्याची जोरदार मागणी केली होती. तर दुसरीकडे पोलीस आयुक्तांना बदलण्याची चर्चा सुरु होती.

राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर आले होते. बैठकीला पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परबही उपस्थित होते. या बैठकीमध्ये सचिन वाझे प्रकरणावर दीर्घकाळ चर्चा पार पडली. मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास ही बैठक सुरु झाली ती सुमारे चार तास सुरु होती. मध्यरात्रीनंतर मंत्री आणि पोलीस अधिकारी वर्षा बंगल्यावरून परतले होते. तर आज गृहमंत्राच्या बंगल्यावर आज याप्रकरणी बैठक पार पडली असून मुंबई पोलीस दलात हा मोठा बदल करण्यात आला आहे.

रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी दिली आहे. तर परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सचिन वाझे या अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्यानंतर हे प्रकरण मुंबई पोलीस आयुक्तांच्या अंगाशी आल्याचं स्पष्ट झालेल आहे. गृहखात्याकडून मुंबई पोलिस आयुक्तपदावरून परमबीर सिंग यांना हटविण्यात आले असून सध्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी वर्णी लागली आहे. राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रजनी सिंग सेठ यांना पाठवण्यात आलेला आहे.

परमवीर सिंग यांना गृहरक्षक दलाची जबाबदारी -


मुंबई पोलीस आयुक्तपदी 29 फेब्रुवारी 2020 रोजी परमवीर सिंग यांनी तत्कालीन पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्या हातून सूत्र स्वीकारली होती. मात्र , मात्र एक वर्ष संपण्याआधीच त्यांना या पदावरून हटविण्यात आलेले आहे. परमवीर सिंग यांना गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

कोण आहेत हेमंत नगराळे

1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपूरचे असून त्यांनी महाराष्ट्र पोलीस खात्यासह देशभरातील इतर ठिकाणी काम केले आहे. या अगोदर हेमंत नगराळे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी 2016 ते 2018 या दरम्यान काम पाहिले आहे. या बरोबरच डीआयजी पदावर सीबीआयमध्ये त्यांनी काम केले असून 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात ताज महल हॉटेल मध्ये जाऊन जखमींना मदत करणार्‍यां मध्ये हेमंत नगराळे हे होते.

Last Updated : Mar 17, 2021, 6:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details