महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

परमबीर सिंग-अनिल देशमुख प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधिशांची समिती करणार

परमबीर सिंह-अनिल देशमुख प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधिशांची समिती करणार आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत न्यायाधीशमार्फत चौकशीचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

परमबीर सिंग-अनिल देशमुख
परमबीर सिंग-अनिल देशमुख

By

Published : Mar 25, 2021, 9:35 AM IST

मुंबई -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. ठाकरे सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून या प्रकरणाची निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरीता एक समिती गठीत केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

म्हणून चौकशी समिती बनवणार?

परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी हायकोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश नेमण्यात येणार आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत न्यायाधीशमार्फत चौकशीचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

काय आहे याचिकेत

गृहमंत्र्यांनी चौकशी झाल्याचे कारण देत आपल्याला मुंबई आयुक्त पदावरुन पायउतार केल्याचे सांगितले होते. पण मला कोणीही चौकशीसाठी बोलावले नाही. माझी कुठल्याही प्रकारची चौकशी एटीएस किंवा एनआयएकडून झालेली नाही. त्यामुळे आपण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची आणि आपल्या बदली मागच्या कारणांची चौकशी करावी, अशी याचिका परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याची माहिती आहे.

हेही वाचा -Live Updates : महाराष्ट्रात कोरोनाचे आज किती रुग्ण? वाचा नेमकी स्थिती...

ABOUT THE AUTHOR

...view details