मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Parambir Singh Case ) यांच्यावरील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवली आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश बाजूला ठेवला आहे. त्यामुळे हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारला मोठा बसला आहे. दरम्यान, यावर आता भाजपा नेते किरीट सोमैया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय म्हणजे ठाकरे सरकारला फटका असल्याचे सोमैया यांनी म्हटलं ( kirit Somaiya Warning Thackeray Government ) आहे.
नेमकं काय म्हणाले सोमैया? -"सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. उद्धव ठाकरे सरकारच्या थोबाडीत मारण्याचे काम न्यायालयाने केले आहे. आता संजय राऊत यांचा उर्मटपणा आणि पोलिसांचा माफिया म्हणून होणारा वापर थांबणार आहे. ठाकरे सरकारची उलटी गिनती आता सुरू झाली आहे," असा इशाराही किरीट सोमैयांनी दिला आहे.