मुंबई - 100 कोटी कथित वसुली प्रकरणाची ( 100 crore recovery case ) चौकशी करण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाच्या ( Chandiwal Commission ) एका सदस्यीय समिती समोर माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग, माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे या तिघांचीही चौकशी करण्यात आली आहे. आता या आयोगासमोर पुन्हा माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची पुन्हा चौकशी करण्यात येणार ( Param Bir Singh Enquiry ) असल्याची माहिती मिळाली आहे. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी परमबीर सिंग यांची चौकशी आयोगासमोर होणार आहे.
चांदीवाल आयोगासमोर चौकशी -
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील बार रेस्टॉरंट मधून शंभर कोटी वसुली करण्याचे सचिन वाजे यांना टार्गेट दिले होते असे धक्कादायक खुलासा पत्राद्वारे केला होता. त्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर राज्य सरकारने या सर्व प्रकरणाची तपास करण्याकरीता निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या एक सदस्यीय समितीचे गठण करण्यात आले होते. या समितीसमोर आतापर्यंत अनिल देशमुख, सचिन वाझे यांचे जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर या प्रकरणात परमबीर सिंग यांचादेखील जबाब नोंदविण्यात आला.
केले होते प्रत्रिज्ञापत्र दाखल -