महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Param Bir Singh Extortion Case : 'त्या' दोन पोलीस अधिकाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - परमबीर सिंह खंडणी प्रकरण

परमबीर सिंह(Parambir Singh) यांच्या खंडणी प्रकरणात(extortion case) मुंबई पोलीस(Mumbai Police) दलातील दोन अधिकाऱ्यांना महाराष्ट्र CID ने 8 नोव्हेंबरला अटक केली. नंदकिशोर गोपाळे आणि आशा कोरखे असे त्या आरोपींची नावे आहेत. त्यांना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

court
किल्ला कोर्ट

By

Published : Nov 16, 2021, 6:42 PM IST

Updated : Nov 16, 2021, 7:01 PM IST

मुंबई -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह(Parambir Singh) यांच्या खंडणी प्रकरणात(extortion case) मुंबई पोलीस(Mumbai Police) दलातील दोन अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र केंद्रीय गुप्तचर संस्थेने(CID) 8 नोव्हेंबरला अटक केली होती. नंदकिशोर गोपाळे आणि आशा कोरखे असे त्या आरोपींची नावे आहेत. त्यांना सुरुवातीला सीआयडी कोठडी दिली होती. ती संपल्यामुळे आज त्यांना पुन्हा किल्ला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी(14 days judicial custody) सुनावली आहे.

अनिकेत निकम - नंदकिशोर गोपाळे यांचे वकील

नंदकिशोर गोपाळेचे मुक्काम तळोजा जेलमध्ये -

नंदकिशोर गोपाळे यांना आर्थर रोड जेलमध्ये न ठेवता तळोजा जेलमध्ये ठेवण्यात यावे अशी मागणी गोपाळे यांच्या वकिलांकडून न्यायालयात केली आहे. आर्थर रोड जेलमध्ये त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. तसेच या जेलमध्ये त्यांनी तपासलेल्या अनेक प्रकरणातील आरोपी आहेत. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे त्यांना तळोजा जेलमध्ये ठेवण्यात यावे अशी विनंती न्यायालयाला केली होती. ती न्यायालयाने मान्य केली आहे.

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात श्याम सुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात ही अटक करण्यात आली आहे. श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये परमबीर सिंह यांच्याविरोधात वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?

गुन्हे मागे घेण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांना खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंह यांच्यासह उपायुक्त अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पोलीस निरिक्षक आशा कोकरे, पोलीस निरिक्षक नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरखे या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली असून त्यांना काल (सोमवारी) अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके हे वांद्रे गुन्हे शाखा कक्ष 9 मध्ये कार्यरत होते.

श्यामसुंदर अग्रवाल यांचे पुतणे शरद अग्रवाल यांच्या तक्रारीवरून ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यामध्ये वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती आणि तपास करण्यात आला होता. त्यानंतर तेच प्रकरण महाराष्ट्र सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आले होते.

Last Updated : Nov 16, 2021, 7:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details