मुंबई :केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या समर्थकांना पंकजा मुंडे मंगळवारी भेटणार आहेत. मुंबईतील वरळी येथील कार्यालयात पंकजा मुंडे समर्थकांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारीच त्या दिल्लीहून मुंबईला परतणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दिल्ली वारीनंतर समर्थकांची समजूत काढताना पंकजा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर
पंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. पक्ष संघटनेच्या कामानिमित्त त्या दिल्लीत असल्या तरी, भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत त्यांनी भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याचे देखील सूत्रांकडून समजते आहे. प्रीतम यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराजीतून राजीनामे देणारे बीडसह मराठवाड्यातील मुंडे समर्थक उद्या पंकजा मुंडे यांची मुंबईतील वरळी येथील कार्यालयात भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
105 समर्थकांनी दिले राजीनामे