Lata Mangeshkar Health : पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी घेतली लता मंगेशकरांची भेट - ब्रीच कँडी रुग्णालयात घेतली लता मंगेशकरांची भेट
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. लतादीदींची रुग्णालयात जाऊन भेट घेतल्यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी माध्यमांसमोर हात उंचावून लतादीदींची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले.

पंडित हृदयनाथ मंगेशकर
मुंबई -मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी रुग्णालयात जाऊन यांची भेट घेतली. रुग्णालयातील लतादीदींच्या भेटीनंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी रुग्णालयातून बाहेर पडताना प्रसारमाध्यमांसमोर हात उंचावून लतादीदींची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले आहे.
पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी घेतली लता मंगेशकरांची भेट
Last Updated : Feb 5, 2022, 11:37 PM IST