मुंबई - कोरोना व्हायरसनंतर देशभर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात पालघर जिल्ह्यात झालेल्या ३ लोकांच्या हत्येनंतर प्रकरण तापले आहे. अत्यंत क्रूरपणे तिघाजणांची हत्या जमावाने केल्याची घटना घडली. त्यानंतर याचे प्रतिसाद देशभर उमटत आहेत. या घटनेबद्दल बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आपला राग व्यक्त केला. प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनीही आपली बाजू मांडली आहे.
जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर लिहिलंय, ''दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या हत्येला जे लोक जबाबदार आहेत, त्यांना कोणत्याही परिस्थितीत माफ केले नाही पाहिजे. सभ्य समाजात बीभत्स आणि सहिष्णुता असता कामा नये.''