मुंबई:महाराष्ट्रातील राजकीय गदारोळात नव नवे ट्विस्ट पहायला मिळत आहेत. महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेतला आहे.त्यांच्या सोबत झालेल्या बैठकी नंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हणले आहे की, हम हार नही मांगेगे ... आता आमची वेळ आहे त्यांना आता आमचा सामना करावा लागेल, ज्यांना आमचा सामना करायचा आहे त्यांनी मुंबईत यावे. सरकार राहीलेला अडीच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण करणार असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेना नेते अनिल देसाई, संजय राऊत यांच्यात एक बैठक वाय बी सेंटरला झाली या बैठकीनंतर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलतना त्यांनी सांगितले की, कायदेशीरच नाही तर सगळ्या प्रकारचे मार्ग आम्ही आता अवलंबवु. यशवंतराव चव्हाण साहेब तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मरण करुन मी तुम्हाला सांगतो. 'हम हार नही मांनेंगे' आम्ही जिंकणारच, आम्हाला काय करायचे आहे ते आम्ही केलेले आहे. फ्लोअर वर पण आम्हीच जिंकु
ही लढाई आम्हीच जिंकणार लढाई कुठेही होऊ द्या अगदी रस्त्यावर लढायची वेळ आली तरी आमची तयारी आहे. त्यांना आमचा सामना करावाच लागेल. त्यासाठी त्यांना मुंबईत यावे लागेल. त्यांना आम्ही वेळ दिली होती. आता ती वेळ गेली. आता आमचे त्यांना चॅलेंज आहे. याच इमारतीतुन आम्ही महाविकास आघाडीची घोषना केली होती. येथेच आमच्या आघाडीचे बंधन बांधले गेले त्याच इमारतीतुन मी तुम्हाला सांगत आहे. आम्ही जिंकु आणि महाविकास आघाडी या सरकारचा राहिलेला कार्यकाळही पुर्ण करेल आणि पुढचे सरकारही महाविकास आघाडीचेच येईल.
गृहमंत्री जेष्ठ नेते आहेत ते विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्या मुळे ते या बैठकीत होते. आणि शरद पवार देशाच्या राजकारणातील जेष्ठ आणि मोठे नेते आहेत. मी तर त्यांना राजकारणातील भिष्म पितामह म्हणतो. आम्ही कायम एकमेकांच्या संपर्कात असतो आमच्यात सविस्तर चर्चा झाली. आम्हाला जे काही करायचे होते ते आम्ही केले आहे.काॅग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आम्ही एकत्रच आहोत त्यामुळे कोणतीही चिंता नाही. आता थेट फ्लोअर वरच तुम्हाला काय आहे ते पहायला मिळेल असे ही राऊत यांनी स्पष्ट केले
हेही वाचा : मुख्यमंत्री ठाकरे अॅक्टिव्ह मोडवर.. कार्यकर्त्यांना म्हणाले हिंदुत्वावर कायम, पक्षबांधणीसाठी योगदान द्या