मुंबई -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. राज्याचे रूग्णालयात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी इतर राज्यांमधून ऑक्सिजनचे टँकरची वाहतूकीचे काम एसटी चालक करतील अशी, घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती. मात्र, विशेष प्रशिक्षणाशिवाय एसटीच्या चालकांना ऑक्सिजन टँकर वाहतुकीच्या कामाला जुंपल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सातारा विभागातील प्रकार
राज्यात सध्या ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. इतर राज्यांमधून ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी चालक मिळत नसल्याचे मोठे संकट उभे होते. तेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी इतर राज्यांमधून ऑक्सिजनचे टँकरची वाहतूकीचे काम एसटी चालक करतील अशी, घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती. या घोषणेनंतर एसटी महामंडळाने 50 चालक आरक्षित केले. मात्र, त्यांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात आले नव्हते. तर परिवहन विभागानेही अद्याप कोणतीही अधिकृत मागणी केली नसल्याने एसटीच्या चालकांना अद्याप ऑक्सिजन टँकर्स वाहतुकीसाठी पाठवविण्यात आले नाही. मात्र, नुकतेच सातारा विभागातील सुमारे 10 एसटी चालकांना ऑक्सिजन टँकरच्या कर्तव्यावर पाठवविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या चालकांना टँकर्सचा तांत्रिक अडचणीची कोणतीही प्राथमिक माहिती नसून, टँकर्स चालविण्याचे विशेष प्रशिक्षण सुद्धा नसल्याची उघड झाले आहे.
महामंडळाचा अंदाधुंद कारभार