मुंबई -राज्यातील सर्वात मोठी दहीहंडी लावून लोकांचे लक्ष वेधणारे राम कदम या कार्यक्रमाच्या जोरावर आमदार झाले. मात्र, याच दहीहंडी कार्यक्रमात मागील वर्षी वादग्रस्त विधान करून ते अडचणीत आले होते. हे विधान त्यांना भोवणार की, भारतीय जनता पक्ष त्यांना पुन्हा तिकीट देणार हे पाहावे लागेल. तसेच विरोधक याचा फायदा घेत कदम यांना धोबी पछाड देतात का? याकडेही सर्व मतदारांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर घेतलेला घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा आढावा.
हेही वाचा... गुहागर विधानसभा मतदारसंघ : शिवसेना-भाजपच्या कुरघोडीत यंदाही होणार तिसऱ्याचाच लाभ?
घाटकोपर पश्चिम मतदारसंघ हा मतदारांचे संख्याबळ विचारात घेतले, तर या विभागात मराठी मतदार जास्त आहेत. दोन लाख 62 हजार मतदार असलेल्या या मतदार संघात तब्बल दीड लाख मराठी मतदार आहेत. 2009 साली घाटकोपर पश्चिम मधून मनसेच्या तिकीटावर राम कदम हे विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी भाजपच्या उमेदवार असलेल्या पूनम महाजन यांचा पराभव केला होता. हवेची दिशा बघत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 'राम.. राम' करत 2014 साली कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 ची निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर जिंकली आहे. त्यावेळेस देखील त्यांनी 80343 इतक्या बहुमताने त्यांनी विजय मिळवला. परंतु, गेल्या काही वर्षात त्यांचा विधानसभा क्षेत्रातील विकास कामामध्ये गती वाढलेली चित्र दिसत नाही. मध्यंतरी त्यांनी केलेली बेताल वक्तव्य अजूनही घाटकोपरकर विसरायला तयार नाहीत. या जागेवर भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आणि प्रवीण छेडा देखील भाजपमधून या मतदार संघात तिकीट मिळावी यासाठी मोर्चे बांधणी करत आहेत.
हेही वाचा... 'मन'से जाणून घेणार कार्यकर्त्यांचा कौल; मुंबईत जिल्ह्याध्यक्षांची बैठक
जर मनसेनी विधानसभेची निवडणूक लढवली तर मनसेकडून विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल हे या मतदार संघातून निवडणुकीस उभे राहू शकतात. काँग्रेस मधून एन. एस. यु. आयचे वैभव धनावडे ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मराठी बहूल असलेला घाटकोपर पश्चिम मतदारसंघात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा करिष्मा चालला होता. मात्र 2009 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मानणारा मतदार आता भाजप आणि शिवसेनेकडे वळला आहे. त्यातच काँग्रेस राष्ट्रवादीची ताकदही या मतदार संघात कमी झाली आहे. यात आमदार कदम यांना मानणारा त्यांचा वैयक्तीक मतदार ही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भाजपने जर पुन्हा त्यांना उमेदवारी दिली तर ते मोठा विजय ते मिळवू शकतात. मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारले तर ते अपक्ष उभे राहतील, अशी चर्चा आहे. असे झाल्यास कदम आणि भाजपचा उमेदवार यातच मुख्य लढत होईल.
हेही वाचा... महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांचा रंगतदार इतिहास
मतदानाची संख्या पाहता 2009 साली आमदार कदम यांना 60343 इतकी मते मिळाली होती. तेव्हा ते मनसेत होते. 2014 मध्ये त्यात वाढ होऊन कदम यांना मतदान संख्यामध्ये 20 हजाराची वाढ झाली होती. म्हणजे पाच वर्षात जवळपास 20 हजार मतदार त्यांनी वाढवले आहेत. कदम यांनी मनसे सोडल्यानंतर काही नेते-कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीतूनही काहीजण शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे घाटकोपरमधील शिवसेनेची ताकदही वाढली आहे. भाजप आणि शिवसेना जर एकत्र लढली नाही, तर कदम यांना शिवसेनेचे तगडे आव्हान असणार आहे.
विधानसभा निवडणूक २०१४ निकाल
1) राम कदम, भाजप – ८०,३४३