महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BESTs ebike service : बेस्टच्या ई बाईक सेवेसाठी एक लाखाहून अधिक प्रवाशांची नोंदणी

मुंबईत मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असते. यावर उपाय म्हणून बेस्टने आपल्या प्रवाशांसाठी बस थांब्यापासून कार्यालय अथवा कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी ई बाईक सेवा ( E bike service ) सुरु केली आहे.

BESTs ebike service
ई बाईक सेवा

By

Published : Oct 14, 2022, 11:09 AM IST

मुंबई :मुंबईत मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असते. यावर उपाय म्हणून बेस्टने आपल्या प्रवाशांसाठी बस थांब्यापासून कार्यालय अथवा कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी ई बाईक सेवा सुरु केली आहे. ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या ई बाईक सेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद ( Huge response from passengers to Ebike service ) मिळत आहे. आतापर्यंत ई बाईकसाठी तब्बल एक लाखाहून अधिक प्रवाशांनी नोंदणी केल्याचे बेस्ट उपक्रमाचे ( BEST Initiatives ) महाव्यवस्थापक लोकेश चंद्र ( Lokesh Chandra, General Manager of BEST Initiatives ) यांनी सांगितले.

एक लाखाहून अधिक नोंदणी :मुंबईमध्ये रोजच नागरिकांना ट्रॅफिकच्या समस्सेला सामोरे जावे लागते. यामुळे मुंबईकर आपल्या इच्छित स्थळी कधीच वेळेवर पोहचू शकत नाहीत. ट्रॅफिक मुळे वेळ आणि इंधन दोघांची नासाडी होते. वाहतूक कोंडीतून सुटका, वेळेची बचत, सुरक्षित व प्रदूषण मुक्तीसाठी बेस्टने प्रवाशांच्या सेवेसाठी ऑक्टोबरच्या पहिल्या १५ दिवसांत १८० बस थांब्यावर एक हजार ई बाईक उपलब्ध करून दिल्या आहेत. या ई बाईकची संख्या वाढवण्यात येत आहे. ई बाईक सेवेसाठी एक लाखाहून अधिक प्रवाशांनी नोंदणी केली असून जून २०२३ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत ५ हजार ई बाईक उपलब्ध असतील, असे लोकेश चंद्र यांनी सांगितले.


१८० बस थांब्यावर सेवा :बस थांब्यावर उतरल्यावर प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी बेस्टने ई बाईक सेवा उपलब्ध केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर अंधेरी पूर्व व पश्चिम येथे २२ जूनपासून ई बाईक सेवा सुरु करण्यात आली. या ठिकाणी प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पहाता आता १८० बस थांब्यावर ई बाईक सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. एक हजार ई बाईक उपलब्ध झाल्या असून कमर्शिअल व निवासी क्षेत्रात ही ई बाईक सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. विलेपार्ले, जुहू, सांताक्रुझ, खार, वांद्रे, माहीम व दादर या ठिकाणी ई बाईक सेवा ऑक्टोबर महिन्यात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे भविष्यात ई बाईक सेवा व बेस्ट बसची सुविधा एकत्र उपलब्ध करण्याचा प्रयत्न असल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले. वोगो कंपनीच्या ई बाईक असून बेस्ट उपक्रमाने वोगो कंपनीशी करार केल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details