मुंबई - देशातील कोरोना संपला का? देशात अनेक अडचणी आहेत.. पूरस्थिती अजून सावरलेली नाही. बिहारमध्ये या स्थितीत निवडणूक घेणे योग्य आहे का? बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे 24 वर्ष राज्य आहे. तिथल्या जनतेत त्यांच्याविषयी नाराजी आहे. बिहारमध्ये काही लोकांनी सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचे राजकारण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. भाजपासह तिथल्या अन्य पक्षांना स्थानिक समस्या लपवून ठेवायच्या आहेत, त्यामुळे सुशांतचा मुद्दा ते खेचून काढत आहेत. सीबीआय सध्या कुठे दिसत नाही. मारुती कांबळेचे काय झाले.. असे आता म्हणावे लागेल, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमाशी बोलताना लगावला.
व्यसनं कोणत्या क्षेत्रात नाहीत ? काहींना पैशाचे व्यसन असते, असे सांगून संजय राऊत म्हणाले की, एनसीबीचे काम आंतरराष्ट्रीय सीमेवरून येणारे ड्रग्ज रोखण्याचे आहे. पण हे एकेका व्यक्तीला बोलवलं जातंय, असे त्यांनी सांगितले. देशात फिल्म उद्योग वाढत असेल तर, स्वागत आहे. इथला ऐषोराम सोडून कुणी जाणार नाहीत. इथून कुणी जाणार नाही. उलट काश्मीरमध्ये फिल्मसिटी उभारली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.