मुंबई -मुंबईतील मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांना शनिवारी 'एनआयए'च्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने वाझे यांच्या कोठडीत सात एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना सचिन वाझे यांचे बंधू सुधाराम वाझे म्हणाले की, आमचा एनआयए आणि कोर्टावर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला योग्य न्याय मिळेल.
सचिन वाझे यांचा आरोग्य अहवालदेखील सादर करण्याचे निर्देश एनआयए कोर्टाने तपास यंत्रणांना दिले आहेत. कोर्टाने म्हटले आहे की वाझे यांना आवश्यकतेनुसार वैद्यकीय मदत देण्यात यावी. त्यापूर्वी एनआयए कोर्टाने वाझे यांचा भाऊ सुधाराम यांचा अर्ज स्वीकारून त्यांना सचिन वाझे यांना भेटण्याची परवानगी दिली. सुधाराम यांनी वाझेंना भेटण्यासाठी पाच मिनिटाचा वेळ मागितला होता.