मुंबई -नवाब मलिक यांनी सकाळी ट्वीट करत आपण लवकरच स्पेशल 26 रिलीज करतोय असं म्हटलं होतं. तसेच एका अज्ञात एनसीबी अधिकाऱ्याने त्यांना पत्र पाठवलं असून त्यातील माहिती समोर आणणार असल्याचेही ते म्हणाले होते. त्यानुसार त्यांनी त्या पत्रातील मजकूर सार्वजनिक केला असून या पत्रात अनेक गौप्यस्फोट करण्याता आला आहे. तसेच यासदर्भात पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आमची लढाई ही आमची लढाई एनसीबीशी नसून, समीर वानखेडेंसारख्या भ्रष्ट लोकांशी असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.
काय म्हणाले नवाब मलिक -
मागच्या दोन दिवसांपासून एनसीबीच्या समीर वानखेडे यांच्या बाबत अनेक बाबी समोर आले आहेत. 6 तारखेपासून आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यामध्ये आता अधिक स्पष्टता अली आहे. आमची लढाई एनसीबीसोबत नाही. एनसीबीबे अनेक वेळा चांगले काम केले आहे. परंतु एक व्यक्ती बोगसगिरी करून नोकरी घेतो. ज्यावेळी या बाबी समोर आणल्या त्यावेळी मात्र वानखेडे म्हणतात माझ्या कुटुंबावर नवाब मलिक आरोप करत आहेत. मी हिंदू मुस्लीम, असा मुद्दा समोर आणत नव्हतो. भाजपाने अनेकवेळा म्हटले नवाब मलिक मुस्लीम असल्यामुळे आशा प्रकरे आरोप करत आहेत. मात्र, मी कधीही असे केले नाही. समीर वानखेडे खोटे जन्म दाखला सादर करून नोकरी घेतात. हे चुकीचे आहे, असे नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
'नोकरीच्या वेळी त्यांनी आपला दाखला बदलला' -
ही लढाई आम्ही अशीच पुढे घेऊन जाणार आहे. मी जो दाखला ट्वीट केला आहे तो खरा आहे. जर तुम्ही लक्षपूर्वक दाखला पाहिला तर तुम्हाला लक्ष्यात येईल की यावर नाव वेगळे एका बाजूला लिहिण्यात आले आहे. समीर वानखेडे जन्मापासून दलित आहेत, असे सर्टिफिकेट दिले त्याआधारे आत्तापर्यंत नोकरी केली. त्यांचे वडील यांनी एका मुस्लीम महिलेसोबत लग्न केले आणि त्यानंतर ते मुस्लीम म्हणून राहत होते. परंतु नोकरीच्या वेळी त्यांनी आपला दाखला बदलला. त्यांनी वडिलांच्या जातीचा वापर केला. जर मी सादर केलेल सर्टिफिकेट खोट आहे तर मग त्यांच्या वडिलांनी किंवा स्वतः वानखेडे यांनी आपले जन्म प्रमाणपत्र समोर आणावे, असे आवाहनही नवाब मलिकांनी दिले.
'पत्रातून धक्कादाय माहिती समोर' -
मला दोन दिवसांपूर्वी एक पत्र आले आहे. ज्यामध्ये खूप धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. हे पत्र मुख्यमंत्री, पोलीस कमिशनर, सोनिया गांधी यांना पाठवण्यात आला आहे. मी महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मुख्यमंत्री यांना याबाबत चौकशी करण्याबाबत बोलणार आहे. तसे पत्र देखील मी त्यांना देणार आहे. त्या पत्रामध्ये 26 प्रकरणे आहेत याची चौकशी करावी. यामध्ये कशाप्रकारे लोकांना फसवण्यात आलं आहे यामध्ये ते नमूद करण्यात आले असल्याचेही नवाब मलिक यांनी म्हटले. मला जे पत्र आले आहे, त्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण घटनांचे उल्लेख आहेत. सध्या मला या प्रकरणाशी संबंधित अनेक लोक मला भेटायला येत आहेत. एक व्यक्ती मला भेटला त्याने सांगितले आहे की, माझी 20 ते 25 कागदांवर सह्या घेतल्या आहेत. यासोबतच एका नायजेरियन व्यक्तीलादेखील त्याने फसवले आहे.
दरम्यान, मी पत्र पाहिले आहे. आम्ही आवश्यक ती कारवाई करू, अशी माहिती मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालक मुथा अशोक जैन यांनी दिली आहे.