मुंबई - नागपूर खंडपीठाने नैसर्गिक ठिकाणी गणेश मुर्त्यांचे विसर्जन करू नये असे आदेश दिले आहेत. या आदेशांचे पालन केले जाईल. बाप्पाचे निर्विघ्न विसर्जन व्हावं हाच आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी मुंबईमधील विसर्जन स्थळांची संख्या वाढवण्यात येईल. सोसायट्यांमध्ये विसर्जनाची व्यवस्था केली जाईल. अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर पेडणेकर यांनी केले आहे.
बाप्पाचे निर्विघ्न विसर्जन व्हावं हाच आमचा प्रयत्न - महापौर किशोरी पेडणेकर
मुंबईतील प्रमुख गणेश विसर्जन स्थळांची मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी गुरूवारी पाहणी करून तयारी कामांचा आढावा घेतला. पुण्यात निर्बंध कडक झाले की तिथे काही बोलणार नाही. इकडे मात्र लगेच ओरडणार असा टोला महापौरांनी विरोधकांना लगावला.
निर्विघ्न विसर्जन व्हावं करण्याचा प्रयत्न
मुंबईतील प्रमुख गणेश विसर्जन स्थळांची मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी गुरूवारी पाहणी करून तयारी कामांचा आढावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना महापौर बोलत होत्या. मुंबईत निर्बंध कडक केल्यास, बाकीचे कडक होतात. पुण्यात निर्बंध कडक झाले की तिथे काही बोलणार नाही. इकडे मात्र लगेच ओरडणार असा टोला महापौरांनी विरोधकांना लगावला. नागपूर खंडपीठाने दिलेल्या गाईडलाईनचे पालन केले जाईल. पालिका प्रशासनाचे कर्मचारी विसर्जनासाठी येणाऱ्या मूर्ती चौपाटीबाहेरच विसर्जीत करतील. त्यासाठी महापालिकेची तयारी पूर्ण आहे. बाप्पाबद्दलच्या संवेदना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेऊ. गणेश विसर्जनाला मुंबईकर आले तर निर्विघ्न विसर्जन व्हावं हाच प्रयत्न असल्याचे महापौरांनी सांगितले. विसर्जनावेळी नागरिक गर्दी करू नयेत यासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवणार आहे. ५०० मीटरच्या अंतरावर तलाव असतील असा प्रयत्न करणार आहोत. गर्दी होऊ नये म्हणून सोसायट्यांमध्येही विसर्जनाची ववस्था केली जाईल असे महापौरांनी सांगितले.