मुंबई - दोन रविवारी लालबाग ते ठाणे आणि वरळी ते दहिसर असे दोन मराठा जोडो अभियान झाले. तिसरा टप्पा येत्या रविवारी वाशी ते नेरुळ असेल. राज्य सरकरने जबाबदारी घ्यावी मराठा समाजाला आरक्षण मिळावं पण गेल्या तीन महिन्यात काहीही निर्णय झालेला नाही. मराठा समाजाची स्थिती ही नोकऱ्या नाहीतच त्यातच वाढीव वीजबिल बोनस म्हणून दिला आहे. यानंतरही आरक्षणाचा निर्णय झाला नाही, तर मराठा समाजाकडून तीव्र आंदोलन केले जाईल व याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा मराठा मोर्चा समन्वयक वीरेंद्र पवार यांनी दिला आहे.
..अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल अन् त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, मराठा समाजाचा इशारा - मराठा समाज आरक्षण आंदोलन
मराठा समाजाकडून मुंबईत मराठा जोडो अभियान सुरू आहे. जर यानंतरही आरक्षणाचा निर्णय झाला नाही, तर मराठा समाजाकडून तीव्र आंदोलन केले जाईल व याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा मराठा समन्वयक वीरेंद्र पवार यांनी दिला आहे.

मराठा मोर्चा समन्वयक वीरेंद्र पवार
मराठा मोर्चा समन्वयक वीरेंद्र पवार माहिती देताना
पत्रकार परिषदेतील मुद्दे -
जो काही निर्णय घ्यायचा असेल तर विरोधकांना सोबत घेऊन घ्या, विरोधकांचे सरकार केंद्रात आहे त्यांची मदत घ्या.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनापैकी अजूनही एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही
शैक्षणिक वर्ष वाया जातंय की काय, अशी भीती आम्हाला वाटत आहे
आमचं मराठा जोडो अभियान आहे जोडोचं जोडे होऊ नये
आता फक्त मराठा जोडो अभियान आहे त्यानंतर काही दिवसांनी त्याच ठिकाणी तीव्र आंदोलन केले जाईल व त्याला सरकार जबाबदार असेल
Last Updated : Nov 20, 2020, 3:41 PM IST