महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मच्छिमारांना नुकसानीची रक्कम तात्काळ वितरित करण्याबाबत कारवाई करण्याचे बँकांना आदेश - tauktae Fisherman government help

तौक्ते चक्रीवादळामुळे वादळग्रस्त मच्छिमारांसाठी आर्थिक मदतीचे निकष बदलून मदत मिळण्याबाबत बैठक पार पडली. वादळग्रस्त मच्छिमारांना शासनाकडून मंजूर झालेली नुकसानीची रक्कम तात्काळ वितरित करण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले.

tauktae Fisherman Damage
मच्छिमार नुकसान शासन मदत

By

Published : Jun 16, 2021, 10:57 PM IST

Updated : Jun 16, 2021, 11:05 PM IST

मुंबई -तौक्ते चक्रीवादळामुळे वादळग्रस्त मच्छिमारांसाठी आर्थिक मदतीचे निकष बदलून मदत मिळण्याबाबत बैठक पार पडली. वादळग्रस्त मच्छिमारांना शासनाकडून मंजूर झालेली नुकसानीची रक्कम तात्काळ वितरित करण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले.

हेही वाचा -शासनाचा आज केव्हा उजाडणार? शिक्षकांना लोकल प्रवासास अजूनही परवानगी नाही

तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या वादळग्रस्त मच्छिमारांसाठी आर्थिक मदतीच्या निकषाबाबत शासन विचार करत असून मच्छिमारांच्या सर्व बाजू समजावून घेवून सर्वानुमते निर्णय घेवून कार्यवाही करण्यात येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात तौक्ते चक्रीवादळामुळे वादळग्रस्त मच्छिमारांना आर्थिक मदतीचे निकष बदलून मिळावे यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, उपसचिव मत्स्य श्रीनिवास शास्त्री, राजेंद्र जाधव, कोकणचे प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -अँटिलिया प्रकरणात दोघांना अटक; एक गाडीचा चालक तर दुसरा मालक

मच्छीमारांना तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानासंदर्भात बँकांसोबत देखील चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. वादळग्रस्त मच्छिमारांना शासनाकडून मंजूर झालेली नुकसानीची रक्कम तात्काळ वितरित करण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले. यापूर्वीच निसर्ग चक्रीवादळावेळी शासनाने जुन्या निर्णयामध्ये अमुलाग्र बदल करून घेतल्यामुळे शासनाकडून आपदग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ झाली आहे. निसर्ग चक्रीवादळातील आपादग्रस्तांकरिता राज्य शासनाकडून केंद्र सरकारला १ हजार ४० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला होता. केंद्र शासनाने फक्त २६८ कोटी रुपयांची मदत केली, तर राज्य शासनाने ७८० कोटी रुपयांची आपदग्रस्तांना मदत केली आहे. मच्छीमारांच्या बाबतीत शासन सकारात्मक असून त्यांनी केलेल्या मागण्याबाबत सर्वानुमते योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीला आश्वासित केले.

तौक्ते चक्रीवादळग्रस्त मच्छिमारांना मदतीसाठी शासन सकारात्मक

शासनाकडून मच्छिमार बांधवांनी मांडलेल्या सर्व मुद्‌यांवर शासन सकारात्मक कार्यवाही करेल. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेसही शासनाने अनेक नियम बदलून वादळग्रस्तांना मदत केली आहे. त्याच पद्धतीने तौक्ते चक्रीवादळग्रस्त मच्छिमार यांनाही मदत देण्याबाबत शासन सकारात्मक आहे, असेही यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने यावेळी मच्छिमार बांधवांच्या तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत बैठकीत माहिती दिली. वाढवून मिळणारी मदत ही रोख रक्कम अथवा एखाद्या योजनेमार्फत मिळावी, मासळी सुकविणारे छोटे मत्स्यव्यावासायिक यांनाही मदत करावी, अशा विविध मागण्या त्यांनी मांडल्या.

हेही वाचा -शिवसेना नेत्या श्रद्धा जाधव यांच्यासह सहा जणांवर माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Last Updated : Jun 16, 2021, 11:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details