मुंबई- एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात आरोप - प्रत्यारोपाचे रंगलेले नाट्य संपता संपत नाही आहे. समीर वानखेडे प्रकरणी दिल्लीच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं मलिकांविरोधात ७ दिवसांत FIR दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत. यावर बोलताना भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांनी आता मुंबई पोलिस नवाब मलिक यांच्यावर एफआयआर दाखल करते का? हे बघणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.
मुंबई पोलीस नवाब मलिकांना अटक करणार का? मोहित कंबोज
समीर वानखेडे प्रकरणी दिल्लीच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं मलिकांविरोधात ७ दिवसांत FIR दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत. अॅट्रोसिटी प्रकरणी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता मुंबई पोलीस कधी मंत्री नवाब मलिकांविरोधात FIR दाखल करणार? आणि हा अदखलपात्र गुन्हा असल्याने त्यांना अटक करणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. भारतीय संविधानाचा विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांनी दिली आहे.