मुंबई -कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकेवर काढले असून, राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व शासकीय तसेच निमशासकीय विभागातील 50 टक्के कर्मचारी उपस्थितीचा निर्णय घेण्यात आला आहे. आता एसटी महामंडळाने सुद्धा चालक, वाहक आणि यांत्रिक विभागातील कर्मचारी वगळून, इतर कर्मचाऱ्यांना 50 टक्के उपस्थितीतीचे आदेश दिले आहेत.
कोरोनाचा प्रसार प्रशासकीय कार्यालयामध्ये होऊन कमर्मचा-यांना संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने कार्यालयीन कर्मचा-यांची उपस्थिती ५० टक्के ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळास वाहतूक व्यवसायासाठी "लोकोपयोगी सेवा" म्हणून घोषित केलेले आहे. त्यामुळे वाहतूक सेवा पुरविणे एसटी महामंडळास बंधनकारक आहे. मात्र एसटी महामंडळाने देखील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, यानुसार चालक, वाहक व यांत्रिक विभागातील कर्मचारी सोडून इतर कर्मचाऱ्यांना 50 टक्के उपस्थितीचे आदेश देण्यात आले आहेत.
दक्षता घेण्याचा सूचना