मुंबई- भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील निवासस्थान महाराष्ट्र सरकारतर्फे खरेदी करुन तेथे आंतरराष्ट्रीय स्मारक आणि संग्रहालय निर्माण करण्यात येणार आहे. त्या स्मारकामध्ये आंबेडकरी अनुयायांची गर्दी होईल, याबाबतची तक्रार झाली आहे. त्यामुळे लंडनमधील स्थानिक पालिका असणाऱ्या कॅमडेन कौन्सिलने या स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटिश कॉन्सिल व बिकेसी येथे लंडन येथील स्मारक झालं पाहिजे, या मागणीसाठी ब्रिटिश कौन्सिल मुर्दाबादचा घोषणा देत आरपीआय कार्यकर्त्यांनी गुरुवारी आंदोलन केले.
लंडनमधील आंबेडकर स्मारक अन्यत्र हलवण्यास विरोध; आरपीआयचे आंदोलन - ब्रिटिश कोन्सिल
लंडनमधील हेनरी रस्त्यावरील संग्रहालयास अन्यत्र हलवण्याचा लंडनमधील स्थानिक पालिकेचा निर्णय आहे. त्यामुळे ब्रिटिश कौन्सिल मुर्दाबादचा घोषणा देत आरपीआय कार्यकर्त्यांनी गुरुवारी आंदोलन केले.

लंडनमधील हेनरी रस्त्यावरील संग्रहालयास अन्यत्र हलवण्याचा लंडनमधील स्थानिक पालिकेचा निर्णय आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी लंडनच्या स्थानिक न्यायालयात महाराष्ट्र सरकारने अपील केले आहे. भारत सरकारतर्फेही ब्रिटन सरकारशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यात येण्याचा प्रयत्न आहे. “ब्रिटन आणि भारत दोन्ही सरकारमध्ये चांगले संबंध असून लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द होऊ नये, म्हणून आपण सर्व स्तरावर प्रयत्न करत आहोत, असे रामदास आठवले यांनी सांगितले. त्यानुसारच लंडनमध्ये स्मारक झाले पाहिजे याकिरता कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले होते.