महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

इंटेलिजन्स फेल्युअर नाही, राजकारण करण्यापेक्षा सहकार्य करा; गृहमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं

दिल्ली पोलिसांकडून सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यामधील समीर कालिया हा दहशतवादी मुंबईमधील सायन येथे वास्तव्यास होता.

Dilip Walse Patil
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

By

Published : Sep 15, 2021, 3:15 PM IST

मुंबई - दिल्ली पोलिसांकडून सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यामधील समीर कालिया हा दहशतवादी मुंबईमधील सायन येथे वास्तव्यास होता. या दहशतवाद्यांकडून लोकलसह मुंबईतील काही भागांची रेकी केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज तातडीची बैठक घेतली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, एटीएस प्रमुख विनित अग्रवाल यांच्यासह काही वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबईची जीवनवाहिनी; लोकलसह महत्वाच्या ठिकाणांची केली रेकी

  • इंटेलिजन्स फेल्युअर नाही - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

दरम्यान, एवढ्या गंभीर घटनेबाबत मुंबई पोलीस किंवा एटीएस विभागाला काहीच माहिती नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गृहमंत्री म्हणाले की, एटीएस किंवा मुंबई पोलिसांचे कोणतेही इंटेलिजन्स फेल्युअर झाले नाही. एटीएस आता यासंबंधीचा तपास करत असल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्र्यांनी दिले. तसेच मुंबईशी संबंधित असलेला दहशतवादी समीर कालिया यावर 2001 मध्ये लहान गुन्ह्याची नोंद होती. मात्र, त्यानंतर समीर कालिया याचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचीही माहिती गृहमंत्र्यांनी यावेळी दिली.

  • पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप नाही -

पोलीस किंवा राज्य सरकारच्या इतर तपास यंत्रणेत कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही. पोलीस आपल्या पूर्ण क्षमतेने योग्य ते काम करत आहेत. तसेच हा मुद्दा राजकारणाचा नाही. त्यामुळे विरोधकांनी आंदोलन करण्याऐवजी सहकार्य केले पाहिजे, असा टोला गृहमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे.

हेही वाचा -दहशतवाद्यांना मदत करणारा 'अजगर' मुंबई पोलिसांच्या ताब्यात; गृहमंत्र्यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

ABOUT THE AUTHOR

...view details