महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराचे अद्याप विरोधी पक्षाला निमंत्रण नाही -अजित पवार - Cabinet Expansion

मंत्रिमंडळ विस्तार कार्यक्रमाला आम्हाला कोणतेही निमंत्रण आलेले नाही. ( Cabinet Expansion ) तसेच, राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अधिकृत घोषणाही करण्यात आली नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार

By

Published : Aug 8, 2022, 6:57 PM IST

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होईल अशा चर्चा सध्या ऐकण्यात आले आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार कार्यक्रमाला आम्हाला कोणतेही निमंत्रण आलेले नाही. ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) तसेच, राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अधिकृत घोषणाही करण्यात आली नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. मात्र, ज्याप्रमाणे सध्या बैठका आणि घडामोडी सुरू आहेत. त्या पहिल्या तर रात्री उशिरापर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचे निमंत्रण येऊ शकते अशी शक्यता ही अजित पवार यांनी वर्तवली आहे.

रात्री उशिरापर्यंत आमंत्रण येऊ शकते - तातडीने विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलवण्यात आली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते यांना कळवण्यात आले असून, या सल्लागार समितीच्या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होईल याबाबत सांगण्यात आलेले नाही. मात्र, याबाबत हे रात्री उशिरापर्यंत नक्कीच राज्य सरकारकडून आपल्याला कळवण्यात येईल असही अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.

त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहीजे - यावेळी अब्दुल सत्तार यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत अजितदादा म्हणाले की, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहीजे. अब्दुल सत्तार म्हणतात ते खरे आहे की, त्यांच्याबाबत आलेली बातमी खरी आहे. हे जनतेला कळले पाहीजे. चौकशीनंतर जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहीजे, अशी मागणीही अजितदादा यांनी केली आहे.

सरकारने अधिकार सचिवांना दिलेले नाहीत - मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याबाबत सरकारने ४ ऑगस्ट रोजी पत्र काढले होते. त्यानंतर विरोधी पक्ष म्हणून आक्षेप घेतला असता, सरकारने नवीन पत्र काढून असे अधिकार सचिवांना दिलेले नाहीत, असे स्पष्टीकरण दिले आहे. तरीही पहिले पत्र काढून सरकारने लोकप्रतिनिधींवर अविश्वास दाखवला होता, असा टोलाही अजित पवार यांनी सरकारला लगावला आहे.

प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्यांवर याचा परिणाम होतो - टीईटी परीक्षा प्रकरणात आता ईडी तपास करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. कुणाच्या वरदहस्तामुळे टीईटी घोटाळा झाला असेल तर त्यावर कारवाई झाली पाहीजे. मेरिटच्या विद्यार्थ्यांवर अशा घोटाळ्यामुळे अन्याय होतो. ज्यांच्यामुळे पेपर फुटतात किंवा वेगळ्या मार्गाने पास केले जाते, त्याचा विपरीत परिणाम प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्यांवर होतो, असे अजितदादा म्हणाले.

हेही वाचा -Mumbai Police Seized Drugs: मुंबई पोलिसांकडून दीड वर्षात 214 कोटी 68 लाख रुपयाचा ड्रग्ज जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details