मुंबई राज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार येताच मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. Mumbai Municipal Corporation विशेष म्हणजे या बदल्या राजकीय दबावाखाली केल्या जात आहेत. Municipal Corporation एखाद्या अधिकाऱ्याची बदली केल्यावर काही दिवसात पुन्हा त्याच अधिकाऱ्याला जुन्या नियुक्तीच्या Question marks on functioning ठिकाणी पुन्हा नियुक्त केले जात आहे. यामुळे मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
सत्तेत बदल होताच अधिकाऱ्यांच्या बदल्यामुंबई महानगरपालिकेत गेल्या २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. गेल्या अडीच वर्षे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते. यामुळे शिवसेनेच्या जवळच्या अधिकाऱ्यांना मोक्याच्या जागी नियुक्त करण्यात आल्याची चर्चा नेहमीच पालिका वर्तुळात होत होती. शिवसेनेमध्ये फूट पडल्यावर एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पालिकेमध्ये शिंदे गट आणि भाजपचा महापौर बसवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत.
आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह आधी बदली नंतर बदली रद्द पालिकेच्या घन कचरा विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांची झोन १ मध्ये तर उपायुक्त झोन १ चंदा जाधव यांची बदली घन कचरा विभागात करण्यात आली होती. 4 ते 5 दिवसात त्यांना पुन्हा त्यांच्या जागी नियुक्त करण्यात आले आहे. परिमंडळ चारचे सहआयुक्त विजय बालमवार यांची बदली उपायुक्त (विशेष) या पदावर करण्यात आली होती, तर या पदावरील संजोग कबरे यांची बदली परिमंडळ चारच्या उपायुक्त पदी करण्यात आली. काही दिवसात या दोघांकडे पुन्हा एकदा मूळ पदाचाच भार सोपवण्यात आला आहे. याच प्रमाणे सह आयुक्त अजित कुंभार यांची पुन्हा शिक्षण विभागात, रमेश पवार यांची सुधार विभागात, केशव उबाळे यांची उपायुक्त दक्षता या विभागात पुन्हा नियुक्ती केली आहे.
आदित्य ठाकरेंच्या जवळच्या अधिकाऱ्याची बदली युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या जवळचे आणि कोरोना काळात धारावी मॉडेल राबवणाऱ्या किरण दिघावकर यांची बदली शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. त्यांना दादर धारावी येथून भायखळा व नंतर बोरिवली येथे बदली करण्यात आली आहे. पालिकेतील इतर अधिकाऱ्यांची त्यांच्या जुन्याच जागी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र दिघावकर यांची मात्र अशा प्रकारे पुन्हा तयच विभागात नियुक्ती करण्यात आलेली नाही. आदित्य ठाकरे यांच्या जवळचे असल्याने त्यांची बदली इतर ठिकाणी करण्यात आल्याची चर्चा पालिकेत आहे.
आयुक्त सक्षम नाहीत पालिका आयुक्त हे अधिकाऱ्याच्या बदलीचे आदेश काढतात आणि नंतर २४ तासात ते आदेश रद्द करतात. मुंबई महापालिकेचा एक इतिहास आहे. ही उल्हासनगर महापालिका नाही. आधी बदली नंतर बदली रद्द असे करणे योग्य नाही. आयुक्त हतबल आहेत. जो आयुक्त स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही, ते मुंबईसाठी बरोबर नाही. आयुक्तांनी सक्षम असायला पाहिजे मात्र हे आयुक्त सक्षम असल्याचे दिसत नाही, अशी टीका पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा Former Leader of Opposition Ravi Raja यांनी केली आहे. दरम्यान याबाबत पालिका आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकलेला नाही.