महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ravi Raja Complaint : पालिका रुग्णालयात औषधे मिळत नाहीत, माजी विरोधी पक्ष नेत्यांची आयुक्तांकडे तक्रार - मुंबई पालिका रुग्णालयात औषधांची कमकरता

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ( Mumbai BMC Hospital ) उपचार घेणाऱ्या गरीब रुग्णांना औषधे मिळत नाहीत. टेंडर प्रक्रियेला उशीर लागत असल्याने गरिबांना औषधापासून वंचित राहावे लागत आहे. याला सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा ( ravi raja complaint to commissioner ) यांनी केला आहे.

Ravi Raja Complaint
रवी राजा

By

Published : May 9, 2022, 7:45 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ( Mumbai BMC Hospital ) उपचार घेणाऱ्या गरीब रुग्णांना औषधे मिळत नाहीत. टेंडर प्रक्रियेला उशीर लागत असल्याने गरिबांना औषधापासून वंचित राहावे लागत आहे. याला सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा ( ravi raja complaint to commissioner ) यांनी केला आहे.


पालिका आयुक्तांना पत्र - मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये औषधाचा पुरवठा होत नसल्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे आणावयास सांगण्यात येत आहे. पालिकेच्या कुठल्याही रुग्णालयांमध्ये औषधाचा पुरवठा होत नाही. औषधांच्या टेंडर काढण्याकरिता सात ते आठ महिने लागत आहेत. एवढा कालावधी लागत असल्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयात औषधांचा पुरवठा होत नाही एखाद्या रुग्णाचा औषध न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो, त्याला जबाबदार कोण असणार आहे असा सवाल माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्त यांना पत्राद्वारे विचारला आहे.

रवी राजा यांचे पत्र

महापालिका प्रशासन जबाबदार -महापालिकेच्या रुग्णालयात येणारे सर्व रुग्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, वेगवेगळ्या राज्यातून उपचारार्थ येत असतात. हे रुग्ण गोरगरीब असतात त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे ते महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल होतात. परंतु महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये औषधाचा पुरवठा नसल्यामुळे या रुग्णांना बाहेरून औषधे स्वतःच्या खर्चाने आणावी लागतात. महापालिकेच्या रुग्णालयात औषध पुरवठा उपलब्ध होत नसल्यामुळे व टेंडर मंजूर होण्याकरता लागणाऱ्या विलंबामुळे महापालिकेच्या रुग्णालयात औषध पुरवठा होत नाही. याला सर्वस्वी जबाबदार महापालिका प्रशासन आहे, असा आरोप रवी राजा यांनी पत्राद्वारे केला आहे.

हेही वाचा -NIA Raids In Mumbai : एनआयएने ताब्यात घेतलेले सलीम फ्रूट आणि सुहेल खंडवानी कोण आहेत? वाचा सविस्तर....

ABOUT THE AUTHOR

...view details